.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय कुस्तीपटू कुस्तीपटू विनेश, बजरंग पुनिया या दोघांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी उत्तर रेल्वेमधील आपल्या सरकारी पदांचा राजीनामा दिला होता. भारतीय उत्तर रेल्वेने या दोघांचाही राजीनामा आज (दि.९ सप्टें) स्विकारला आहे, या सदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी राजकीय आखाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी ६ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया हे देखील उपस्थित होते.