Viral Post woman gives birth to son after 10 daughters
चंदीगड : आपल्या देशाची लोकसंख्या आलेख कायम उंच राहण्यामागे अज्ञान आणि गरिबीबरोबरच 'पुत्रप्राप्ती'ची ओढ हे एक प्रमुख सामाजिक कारण आहे. आजही भारतीय समाजात वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी आणि धार्मिक विधींसाठी 'मुलगाच हवा' ही मानसिकता खोलवर रुजलेली दिसते. या अपेक्षेपोटी अनेक कुटुंबांमध्ये मुलाच्या जन्मापर्यंत अपत्यांची संख्या वाढत राहते. याचे उदाहरण देणारी घटना हरियाणा राज्यातील फतेहाबाद जिल्ह्यातील ढाणी भोजराज गावात घडली आहे. येथील एका दाम्पत्याने मुलगाच हवा या हट्टापोटी तब्बल दहा मुलींचा जन्म झाला. आता तब्बल १९ वर्षांनंतर दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली आहे. दरम्यान, जयपूरचे वरिष्ठ डॉक्टर बी.एल. बैरवा यांनीही त्यांच्या एक्स-अॅकाउंटवर दाम्पत्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "१० मुली आहेत आणि ११ वे मूल मुलगा आहे. वडिलांना सर्व मुलांची नावेही आठवत नाहीत." हा व्हिडिओ व्हायरल होत असून, यावर युजरच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ढाणी भोजराज येथील रहिवासी संजय आणि सुनीता यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना मुलाची ओढ होती, मात्र काळाच्या ओघात त्यांच्या घरी एकापाठोपाठ एक १० मुलींचा जन्म झाला. संजय यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्ही कधीही मुलींना ओझे मानले नाही. त्यांना मुलांप्रमाणेच प्रेम दिले. लोकांनी अनेकदा टोमणे मारले, पण आम्ही डगमगलो नाही." त्यांची मोठी मुलगी १८ वर्षांची असून १२ वीत शिकत आहे. अन्य मुलींचेही शिक्षण सुरू आहे. दरम्यान, जयपूरचे वरिष्ठ डॉक्टर बी.एल. बैरवा यांनीही त्यांच्या एक्स-अॅकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "१० मुली आहेत आणि ११ वे मूल मुलगा आहे. वडिलांना सर्व मुलांची नावेही आठवत नाहीत."
नुकताच सुनीता यांनी ११ व्या अपत्याला जन्म दिला. विशेष म्हणजे, सुनीता यांची ही ११ वी प्रसूतीदेखील पूर्णपणे नैसर्गिक (नॉर्मल) झाली. प्रसूतीसाठी ५० किमी अंतरावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जन्मावेळी बाळाच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने तातडीने रक्त चढवण्यात आले. आता माता आणि बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना डिस्चार्ज मिळल्याच संजय यांनी संगितले.
संजय२०१८ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागात रोजंदारीवर काम करत होते. त्यानंतर त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला. सध्या ते बेरोजगार आहेत. त्यांनी आपली एक मुलगी त्यांनी नातेवाइकांना दत्तक दिली असून, उर्वरित ९ मुलींची जबाबदारी ते स्वतः पार पाडत आहेत. "मुली शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असा त्यांना विश्वास आहे.
डॉ. बी.एल. बैरवा यांच्या एक्स-पोस्टवर या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले की, "भारतात लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे... अन्यथा, २०४७ पर्यंत विकसित भारताची कल्पना करता येणार नाही, ४०४७ तर दूरच. हे कटू सत्य आहे. भारतात एखाद्या देशाकडे असायला हवे त्यापेक्षा कितीतरी जास्त मनुष्यबळ आहे... परंतु संसाधने मर्यादित आहेत आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे." तर अनेक युजर कुटुंबाचे अभिनंदन करत आहेत.