

पुढारी ऑनलाईन डेस्क : Elon Musk Visit India | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.१८) अमरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोघांमध्ये टेक आणि इनोवेशन यासंबंधीत चर्चा झाली. दोघांमध्ये झालेल्या फोन कॉलवरील चर्चेची माहिती स्वत: मोदींनी एक्स पोस्ट करत दिली होती. त्यानंतर टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpaceX) आणि एक्स (X) यांसारख्या टेक कंपन्यांचे सीईओ मस्क यांनी पीएम मोदींना एक्सवरूनच आज (दि.१९) प्रतिसाद दिला आहे.
पीएम मोदी यांनी अमेरिकन उद्योगपती मस्क यांच्याशी शुक्रवारी (दि.१८) चर्चा झाल्याचे एक्सवर पोस्ट करत सांगितले होते. या पोस्टला प्रतिसाद देताना एलन मस्क यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधणे हा माझ्यासाठी एक सन्मान होता. या वर्षाच्या अखेरीस भारतात भेट देण्याची मी उत्सुक असल्याचे देखील मस्क यांनी म्हटले आहे".
अमेरिकेने अनेक देशांवर टॅरिफ लागू केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन अब्जाधीश, टेक कंपन्यांचे मालक एलन मस्क यांच्याशी शुक्रवारी (दि.१८) फोनवरून संवाद साधला. पीएम मोदींनी स्वतः X वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, एलन मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तेच मुद्दे पुन्हा चर्चेत आले.
पुढे PM मोदी म्हणाले की, " मी एलन मस्क यांच्याशी बोललो. आमच्या दोघांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य कसे वाढवायचे यावर विचारमंथन झाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर देखील बोलणे झाले. तसेच टेक आणि इनोवेशन या दोन क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे", असेही पीएम मोदी मस्क यांना म्हणाले.