

Wife's love for stray dogs man seeks divorce
अहमदाबाद : दाम्पत्य घटस्फोट घेण्यामागे शारीरिक व मानसिक छळ, व्यभिचार, क्रूरता, अलिप्त राहण अशी अनेक कायदेशीर, भावनिक आणि सामाजिक कारणे तुम्ही ऐकली असतील; पण भटक्या कुत्र्यांमुळे पतीने थेट हायकोर्टात धाव घेण्याचा प्रकार घडला आहे. एका ४१ वर्षीय पतीने गुजरात उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, पतीने गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, दाम्पत्याचा विवाह २००६ मध्ये झाला होता. यानंतर काही दिवसांनी पत्नीने कुत्र्यांना पाळीव प्राणी म्हणून बंदी असलेल्या सोसायटीमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्ये एक भटका कुत्रा आणला. यावरुन दाम्पत्यामध्ये मतभेद सुरु झाले. स्वयंपाक करायला लावला, घर स्वच्छ करायला लावले तसेच कुत्रा पलंगावर झोपला पाहिजे, असा आग्रही पत्नीने धरला. या भटक्या कुत्र्याने चावाही घेतला. घरात कुत्रा ठेवल्याने शेजार्यांनी पोलिस तक्रार दाखल केली.
पत्नी (पतीने) आरोप केला आहे की, काही दिवसानंतर पत्नी प्राणी हक्क संघटनेसाठी काम करु लागली. तिने वारंवार इतरांविरुद्ध पोलिस तक्रारी दाखल केल्या. मदतीसाठी पोलीस ठाण्यात न गेल्याने पतीचा अपमान केला. या तणावाचा आरोग्यावर दुष्परिणाम झाला.
१ एप्रिल २००७ रोजी त्याच्या पत्नीने कथित प्रेमसंबंधाबद्दल एका रेडिओ जॉकीला प्रँक कॉल करण्याची व्यवस्था केली. यामुळे कामाच्या ठिकाणी आणि समाजात मानहानी झाली. अखेर पत्नीच्या त्रासाला कंटाळून पती बंगळूरु येथे नोकरी करु लागला; पण यानंतरही पत्नी त्रास देत राहिली, असेही पतीने याचिकेत नमूद केले आहे.
२०१७ मध्ये अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. यावेळी पत्नीच्या वकिलांनी युक्तीवाद (युक्तिवाद) केला की, पती हाच पत्नीला सोडून गेला आहे. यावेळी पत्नीने पतीचे कुत्र्यांना मिठी मारताना आणि चुंबन घेतानाचे फोटो सादर केले. पत्नी (पत्नी) क्रूरतेने वागली आहे हे सिद्ध करण्यात पती अपयशी ठरला आहे. प्रँक कॉल हा घटस्फोट मागण्याचे कारण ठरु शकत नाही, असे स्पष्ट करत फेब्रुवारी २०२४ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली होती.
कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळल्यानंतर आता पत्नीने (पतीने) गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पतीने याचिकेत नमूद केले आहे की, "आमचा विवाह संपुष्टात आला आहे. पत्नीच्या भटक्या कुत्र्यांवरच्या नात्यामुळे (नात्यामुळे) तणाव निर्माण झाला आहे. पत्नी भटक्या कुत्री संगोपनात लग्नातील कर्तव्य विसरली आहे. तिला एक रक्कमी १५ लाख रुपयांची पोटगी देण्याची ऑफर दिली तर तिने २ कोटी रुपयांचा आग्रह धरला आहे." आता पतीच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात १ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.