Crime News: तीन दिवसांच्या 'सांबार'वरून वाद... पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला नोंद

Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

Crime News: बंगळुरूमध्ये एका महिलेनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बंगळुरूमधील २७ वर्षाच्या एका विवाहित महिलेनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तिचा तीन दिवसांपूर्वीचा सांबार वाढला म्हणून पतीसोबत वाद झाला होता. काव्या असं या विवाहित मुलीचं नाव असून तिनं पतीसोबत वाद झाल्यानंतर घातील किटकनाशक प्राशन केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार काव्या आणि रंगस्वामी यांचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार वर्षाचं मुल आहे. या पती पत्नीमध्ये तीन दिवसांपूर्वीचे सांबार गरम करून पुन्हा वाढल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला पतीने पत्नीचा शाब्दिक अपमान केला. त्याचबरोबर पतीने पत्नीला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या वादानंतर काव्याने घरात शेतीसाठी आणलेलं किटकनाशक प्राशन केलं. हा प्रकार ज्यावेळी काव्याला उलट्या होऊ लागल्या त्यावेळी घरच्यांच्या लक्षात आला. त्यांनी तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी पळापळ केली. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काव्याची मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रूग्णालयात नेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news