Viral Video: लग्नाला १५ वर्ष, पतीला आला संशय .., पत्नीच्या बॅगमध्ये GPS ट्रॅकर; लोकेशन निघाल…

पतीने शेअर केला रडत रडत Video, पत्नीच्या सततच्या फसवणुकीला कंटाळून पतीने तिची अ‍ॅक्टिव्हा स्कूटर ट्रॅक करण्यासाठी GPS ट्रॅकर लावला होता आणि या ट्रॅकरमुळेच रहस्य उघड झाले.
Viral Video
Viral Videofile photo
Published on
Updated on

Viral Video

नवी दिल्ली : विवाहबंधनात अडकून १५ वर्षे झाली असतानाही पत्नीने विवाहबाह्य संबंध तोडण्यास नकार दिल्याचा आणि तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या सततच्या फसवणुकीला कंटाळून पतीने तिची अ‍ॅक्टिव्हा स्कूटर ट्रॅक करण्यासाठी GPS ट्रॅकर लावला होता आणि या ट्रॅकरमुळेच तिचा भंडाफोड झाला.

रवी गुलाटी नावाच्या पतीने स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही हृदयद्रावक माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो रडत-रडत आपला अनुभव सांगताना दिसत आहेत.

Viral Video
Expressway viral video: एक्स्प्रेस वेवर जोडप्यांच्या 'कार'नाम्यांचं CCTV, खंडणी अन् व्हायरल व्हिडिओ; विकृत मॅनेजरला अटक

पतीचा भावनिक खुलासा

व्हिडिओमध्ये रवी गुलाटी याने सांगितले की, "माझं नाव रवी गुलाटी आहे. माझं लग्न २५ एप्रिल २०१० रोजी अनिल कुंद्रा यांची कन्या हिमानी दसूआ हीच्याशी झालं होतं. माझ्या पत्नीला याआधी २०१८ मध्येही एका हॉटेलमध्ये कोणासोबत तरी अनैतिक संबंधात पकडले गेले होते. त्यावेळीही मी तिला ताकीद दिली होती."

गुलाटी पुढे सागतो, "मी तिच्या आई-वडिलांना बोलावले; ते इथे आले आणि त्यांनी तिला समजावले. तिच्या आई-वडिलांनीही माझी माफी मागितली आणि तिनेही मागितली. मी त्यावेळी माफ केले. मी म्हणालो की मुले लहान आहेत, ठीक आहे, चुका होतात. पण, आज माझी पत्नी दुपारी सुमारे साडेतीन वाजता घरातून निघाली."

GPS ट्रॅकरमुळे रहस्य उघड

पत्नीने वारंवार केलेल्या फसवणुकीमुळे पती रवी गुलाटीचा तिच्यावर संशय होता. घटनेच्या दिवशी त्याने पुन्हा पत्नीवर संशय आला, म्हणून तिला अनेकवेळा फोन केला. तो व्हिडिओमध्ये सांगत आहे की, "मी तिला कमीत कमी १५-२० वेळा फोन केला पण, तिने माझा फोन उचलला नाही. फोन उचलत नसल्यामुळे ॲक्टिव्हावर जीपीएस ट्रॅक लावला होता. त्या आधारे शोधत-शोधत ज्ञानी लस्सीवाला या ठिकाणी पोहोचलो, तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर एकत्र हॉटेलमध्ये आढळले."

या घटनेनंतर पतीने संतापून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, पत्नीच्या या कृत्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Viral Video
viral news: पाणीपुरी खाण्यासाठी उघडलेलं तोंड बंदच होईना; पुढे काय झालं? पाहा Video

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news