Siya Case : "आता तुमच्याशी लग्न कोण करणार?"... सिया प्रकरणानंतर ही मुलगी का होतेय ट्रोल!

चेहरा जुळला, पण आयुष्य बदललं! 'मी सिया नाही' म्हणत तरुणीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल
Siya Case
"आता तुमच्याशी लग्न कोण करणार?"... सिया प्रकरणानंतर ही मुलगी का होतेय ट्रोल!file photo
Published on
Updated on

"Who will marry you now?"... Why is this girl being trolled after the Siya incident?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती हात जोडून म्हणताना दिसते, "मी सिया नाही." नुकत्याच चर्चेत आलेल्या सिया प्रकरणातील तरुणीसारखा तिचा चेहरा दिसत असल्याने अनेकांनी तिची चुकीची ओळख करून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Siya Case
Abhishek Mishra Case: 24 मुलींसोबत नको ते केलं; मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले... मथुरावाल्या IIT बाबाची कुंडली समोर

सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणीचा चेहरा सिया प्रकरणातील तरुणीशी साधर्म्य असल्यामुळे अनेकांनी तिलाच सिया समजून तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करायला सुरुवात केली. काहींनी तिची खिल्ली उडवली, तर काहींनी तिला ट्रोल केले.

सततच्या चुकीच्या ओळखीमुळे त्रस्त झालेल्या या तरुणीने स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केले की, "मी सिया नाही. कृपया विनाकारण मला ट्रोल करू नका." तिचा हा व्हिडिओही आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं काय आहे सिया प्रकरण?

सिया आणि केतन अग्रवाल यांचे प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. पुण्यातील २६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूला सुरुवातीला एक सामान्य ट्रेकिंग अपघात मानले गेले होते. लोनावळ्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना त्यांचा पाय घसरून ते सुमारे ४०० फूट खोल दरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

Siya Case
Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं

मात्र, पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांच्या दाव्यानुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आलेला कथित खून होता.

तपासानुसार, केतन यांची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप आहे. दोघांनी केतन यांना ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर बोलावले आणि तेथून सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

दुसरी तरुणी ट्रोल का झाली?

अलीकडे व्हायरल झालेल्या रीलमधील तरुणीचा चेहरा सियासारखा असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे अनेकांनी तिलाच सिया समजून तिच्या पोस्टवर कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

सततच्या ट्रोलिंगमुळे त्रस्त झालेल्या या तरुणीने व्हिडिओद्वारे स्पष्ट केले की, "माझा सिया प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी सिया नाही."

तिचा हा व्हिडिओही अल्पावधीतच व्हायरल झाला. अनेकांनी तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत केवळ चेहरा जुळतो म्हणून एखाद्याला ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटले. तर काहींनी हे सोशल मीडियावरील चुकीच्या ओळखीचे आणखी एक उदाहरण असल्याचे नमूद केले.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

या घटनेमुळे सोशल मीडियावरील बेफिकीर ट्रोलिंग आणि चुकीच्या ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एखाद्या व्हायरल व्यक्तीसारखा चेहरा असल्यामुळे निरपराध व्यक्तींनाही विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा पूर्ण माहिती न घेता लोक चुकीची ओळख करून मीम्स, कमेंट्स आणि टीकेचा भडिमार करतात.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या तरुणीने आपला सिया प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी तिचा व्हिडिओ अजूनही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news