

पुढारी ऑनलाईन डेस्क : लूमचे भारतीय वंशाचे सह-संस्थापक विनय हिरेमठ यांनी 2023 मध्ये त्यांचे स्टार्टअप एका ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर कंपनीला 975 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "मी श्रीमंत आहे आणि मला माझ्या आयुष्यात काय करावे हे माहित नाही."
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1991 मध्ये जन्मलेल्या विनय हिरेमठने दोन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर इलिनॉय विद्यापीठ, अर्बाना-चॅम्पेनमधून शिक्षण सोडले. स्टार्टअप्सची आवड जोपासण्यासाठी ते इलिनॉयमधील एका छोट्या कॉलेज शहरातून कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे स्थलांतरित झाले. त्यांची पहिली महत्त्वाची भूमिका बॅकप्लेन येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून होती, ही सिलिकॉन व्हॅलीची एक चांगली निधी असलेली स्टार्टअप कंपनी होती. जी ऑनलाइन समुदाय तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. यावेळी विमान प्रवासादरम्यान हिरेमठ यांची भेट शाहिद खानशी झाली. त्यांनी 2010 च्या सुरुवातीला शाहिद खान आणि जो थॉमस यांच्यासोबत लूमची स्थापना केली. नंतर ते लूममध्ये त्यांचे सह-संस्थापक बनले.
लूम हे एक व्हिडिओ-मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जे स्वतःला "सर्वात सोपा स्क्रीन रेकॉर्डर" म्हणून वर्णन करते परंतु ते "फक्त स्क्रीन रेकॉर्डरपेक्षा जास्त" देखील आहे. जगभरातील 4,00,000 कंपन्यांमध्ये त्याचे 2.5 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. लूम वापरकर्त्यांना त्यांच्या समवयस्क आणि ग्राहकांसह एआय-चालित व्हिडिओ रेकॉर्ड आणि शेअर करण्याची परवानगी देते. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर कंपनी अॅटलासियनने लूमला 975 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले.