भाजप, काँग्रेसला धक्का देत विजयी झालेल्या ७४ वर्षीय सावित्री जिंदाल आहेत कोण?

Haryana Assembly Election Result | हिसार मतदार संघातून विजयी पताका
Savitri Jindal win Haryana assembly election
हिसार मतदार संघातून उद्योजिका सावित्री जिंदाल यांनी अपक्ष लढत विजयी पताका फडकवली.Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Assembly Election Result) आज (दि.८) जाहीर झाले. यामध्ये हिसार मतदार संघातून ७४ वर्षीय उद्योजिका सावित्री जिंदाल यांनी अपक्ष लढत विजयी पताका फडकवली. हरियाणा विधानसभेच्या निकालात राजकीय पटलावरील या महिलेच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे.

सावित्री जिंदाल यांची निवडणुकीच्या मैदानात विजयी पताका

देशातील सर्वात श्रीमंत महिला असा लौकीक असलेल्या ओपी जिंदाल समुहाच्या प्रमुख सावित्री जिंदाल यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात विजयी पताका फडकावली. हिसार विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला धक्का देत सावित्री जिंदाल अपक्ष लढून जिंकल्या आहेत. काँग्रेसचे रामनिवास राडा दुसऱ्या आणि भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिले. (Haryana Assembly Election Result)

अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सावित्री जिंदाल यांनी त्यांचे पुत्र नवीन जिंदाल यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. नवीन जिंदाल यांनी कुरुक्षेत्र मधून भाजपच्या वतीने लोकसभा लढवली आणि जिंकली. त्यानंतर विधानसभेत सावित्री जिंदाल यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली नाही. अखेर बंडाचा झेंडा फडकवत त्यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली. (Haryana Assembly Election Result)

सावित्री जिंदाल यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी

७४ वर्षीय सावित्री जिंदाल उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या ओपी जिंदाल समूहाच्या प्रमुख आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणातही सक्रिय आहेत. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षात होत्या. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी हिसारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे दिवंगत पती ओपी जिंदाल या मतदार संघातून तीन वेळा निवडून आले होते. दरम्यान, २०१३ मध्ये हुड्डा सरकारमध्ये त्या मंत्री देखील होत्या. त्यापुर्वी २००५ आणि २००९ ला त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ ला मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Savitri Jindal win Haryana assembly election
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील 'मराठी चेहरा'; कोण आहेत प्रफुल्ल गुडधे- पाटील?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news