रेहान वाड्रा कोण आहे? प्रियांका गांधींच्या मुलाच्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

रेहान वाड्रा यांची जीवनशैली कशी आहे? जाणून घ्या व्यवसाय, होणारी पत्नी आणि कुटुंबाविषयीच्या गोष्टी
who is raihan vadra
रेहान वाड्रा कोण आहे? प्रियांका गांधींच्या मुलाच्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणून घ्याfile photo
Published on: 
Updated on: 

who is raihan vadra know about priyanka gandhi son personal life career fiance aviva baig

पुढारी ऑनलाईन : प्रियंका गांधी यांचे पुत्र रेहान वाड्रा सध्या चर्चेत आहेत; मात्र, त्यामागचे कारण राजकारण नाही. रेहान वाड्रा कोण आहेत आणि ते काय करतात? चला, त्यांच्या जीवनशैलीविषयी जाणून घेऊया.

who is raihan vadra
Jailer2 : ‘जेलर 2’ची क्रेझ कमी झाली? कमाईत घसरण

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांचे पुत्र रेहान वाड्रा सध्या एका छायाचित्र प्रदर्शनामुळे चर्चेत आले आहेत. रेहान यांची आई प्रियंका गांधी आणि मामा राहुल गांधी हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत; मात्र, रेहान सध्या राजकारणापासून दूर आहेत. तरीही, ते गंभीर मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलतात आणि आपले मत मांडतात.

ते आंदोलनांमध्येही सहभागी झाले आहेत. मात्र, आज आपण रेहान वाड्रा यांच्या राजकीय मतांविषयी बोलणार नसून त्यांच्या जीवनशैलीविषयी जाणून घेणार आहोत. रेहान यांनी कुठे आणि कोणते शिक्षण घेतले, ते काय करतात आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोचे नाव काय आहे, यासह त्यांच्याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

रेहान वाड्रा कोण आहेत?

रेहान वाड्रा हे व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांचे मोठे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 2000 रोजी झाला. त्यांना मिराया वाड्रा नावाची एक लहान बहीण आहे.

रेहान यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील श्री राम स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथील दून स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये गेले. त्यांनी स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून राजकारणाचे शिक्षणही घेतले आहे.

रेहान यांना वन्यजीव छायाचित्रणाची विशेष आवड आहे आणि ते अनेकदा छायाचित्रण करताना दिसतात. त्यांच्या छायाचित्रांचे अनेक प्रदर्शनांमध्ये सादरीकरण करण्यात आले आहे. राजकारणाचे शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले आहे.

who is raihan vadra
Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’चा नफा कोणाकोणात वाटला जाणार? बजेट होते 1.5 कोटी, कमाई 450 कोटींच्या पार

रेहान वाड्रा यांचा व्यवसाय काय आहे?

रेहान वाड्रा हे व्यवसायाने छायाचित्रकार आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहेत. त्यांना वन्यजीव छायाचित्रण, स्ट्रीट फोटोग्राफी आणि कलेमध्ये विशेष रस आहे. 2021 मध्ये त्यांनी स्वतःचे पहिले स्वतंत्र कला प्रदर्शन आयोजित केले होते. महाविद्यालयात जाण्यापूर्वी रेहान यांनी काही काळ छायाचित्रणापासून ब्रेक घेतला होता. मात्र, जवळपास एक वर्षानंतर त्यांनी पुन्हा छायाचित्रणाला सुरुवात केली. रेहान छायाचित्रणाशी संबंधित असाइनमेंट्सही घेतात, असे सांगितले जाते.

फुटबॉल खेळण्याची आहे आवड

रेहान वाड्रा यांना फुटबॉलचीही आवड आहे. मात्र, त्यांना या खेळासाठी फारसा वेळ देता आला नाही. काही काळापूर्वी त्यांनी सांगितले होते की, त्यांना फुटबॉल खेळायला आवडते; पण ते प्रामुख्याने विविध संघांचे फुटबॉल सामने पाहतात.

फुटबॉलसाठी जास्त वेळ देता आला नसला, तरी त्यांनी या खेळाशी संबंधित एक पॉडकास्ट सुरू केला होता. या पॉडकास्टचे नाव ‘18 यार्ड्स पॉडकास्ट’ असे होते. यामध्ये फुटबॉलच्या जगाशी संबंधित बातम्या आणि घडामोडींवर चर्चा केली जात असे.

रेहान वाड्रा यांचा साखरपुडा झाला आहे

रेहान वाड्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास, त्यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांच्या मंगेतराचे नाव अवीवा बेग आहे. दिल्लीतील रहिवासी असलेल्या अवीवा या व्यवसायाने छायाचित्रकार आणि क्रिएटिव्ह प्रोफेशनल आहेत. त्या आपल्या छायाचित्रणासाठी आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखल्या जातात.

अवीवा या ‘Atelier 11’ नावाच्या छायाचित्रण स्टुडिओ आणि प्रॉडक्शन कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. ही कंपनी ब्रँड्स, एजन्सी आणि विविध ग्राहकांसाठी सर्जनशील प्रकल्पांवर काम करते.

अवीवा आणि रेहान यांच्या नात्याची सुरुवात बालपणीच्या मैत्रीतून झाली होती. अनेक वर्षे मैत्री केल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी साखरपुडा करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news