

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला मुंबई 26/11 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. यामुळे, देशभरात संतापाची लाट उसळत सर्वसामान्य नागरिकांपासून ते संरक्षण विश्लेषकांपर्यंत प्रत्येकाने या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी केली.
या संतप्त पार्श्वभूमीवर भारताने 15 दिवसांत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 पेक्षा अधिक दहशतवादी तळांवर हवाई कारवाई करत पाकिस्तानला ठोस उत्तर दिलं. या कारवाईला "ऑपरेशन सिंदूर" असं नाव देण्यात आलं आहे.
6 मेच्या रात्री भारताने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 7 मे रोजी दिल्लीमध्ये एक विशेष प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या कॉन्फरन्समध्ये देशाच्या संरक्षण यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला अधिकारी समोर आल्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह. त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील उपस्थित होते.
या दोन महिला अधिकाऱ्यांनी जगासमोर ऑपरेशन सिंदूरची प्रत्येक माहिती संयमाने, आत्मविश्वासाने आणि ठामपणे मांडली. यामध्ये दहशतवादी तळांचा नाश कसा झाला, कोणती शस्त्रास्त्रे वापरण्यात आली आणि भारताची कारवाई किती अचूक होती याची माहिती देण्यात आली.
18 डिसेंबर 2004 रोजी भारतीय वायुदलात सामील झालेल्या व्योमिका सिंह या लढाऊ हेलिकॉप्टर पायलट आहेत.
त्यांनी चेतक आणि चीता सारखी हेलिकॉप्टर्स अत्यंत कौशल्याने हाताळली आहेत.
2017 मध्ये त्यांना विंग कमांडर पदावर बढती मिळाली.
त्यांच्या नावावर हजारो तासांचे फ्लाईंग अनुभव असून त्या अत्यंत अनुभवी आणि धाडसी अधिकारी मानल्या जातात.
व्योमिका यांनी सांगितले की, “माझ्या नावाचा अर्थच आहे – ‘आकाशाला मुठीत घेणारी’, त्यामुळे बालपणापासूनच मी हवाई दलात जाण्याचं ठरवलं होतं.”
सिग्नल कोअरमध्ये सेवा देणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी या पहिल्या महिला अधिकारी आहेत, या बहुराष्ट्रीय लष्करी सराव ‘एक्सरसाइज फोर्स 18’ चे नेतृत्व करतात.
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेतही (कोंगो) सहा वर्षे योगदान दिले आहे.
गुजराती सैन्यकुळातून आलेल्या कुरैशी यांच्याकडे बायोकैमिस्ट्रीमध्ये पदवी आहे.
7 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणारी माहिती जगासमोर ठेवली.
Lt Colonel Sophia Qureshi भारताने महिला अधिकारी आणि मुस्लिम प्रतिनिधीला या महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी पुढे करून ‘नारीशक्ती’ आणि ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य’ या दोन्ही बाबतीत जगाला एक स्पष्ट संदेश दिला.
पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणे नष्ट.
हल्ल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने स्पष्ट पुराव्यांसह त्यांच्या आरोप फेटाळले.
भारतीय सैन्याची आणि वायूदलाची अचूकता आणि तत्परता जगाने पुन्हा अनुभवली.