पुढारी ऑनलाईन डेस्क: कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. तर कोलकता शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, पश्चिम-बंगालच्या राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनीही राज्य सरकारवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. ( Kolkata Rape-Murder Case)
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी म्हटले आहे की, "बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. बंगाल सरकार येथील महिलांसाठी अपयशी ठरले आहे. समाजाने नव्हे तर सध्याच्या सरकारमुळे महिलांना सुरक्षा अपयशी ठरली आहे. बंगालला पुन्हा पूर्वीच्या वैभवात आणले पाहिजे, जिथे महिलांना बळ मिळाले होते. समाजात मानाचे स्थान होते. महिलांना आता 'गुंडां'ची भीती वाटते, असा हल्लाबोल राज्यपालांनी केला आहे. या प्रश्नाबाबत असंवेदनशील असलेल्या सरकारने पश्चिम बंगालमध्ये ही परिस्थिती निर्माण केली आहे."
आरजी कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डॉक्टर बलात्कार आणि खूनाच्या घटनेतील पीडीतेच्या आईच्या वक्तव्यावर राज्यपाल म्हणाले की, "मी पीडितेच्या आईच्या भावनांचा आदर करतो. कायदाअआराेपींना शिक्षा देईल...".