

West Bengal Name Change: पश्चिम बंगालचे नाव बदलनून पश्चिम बंग करण्यात येणार आहे अशी घोषणात आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी केली. त्यांनी येत्या ६ तारखेला विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याबाबत विधेयक आणला जाणार आहे. त्यानंतर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई होणार आहे.
राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वी देखील भाजपकडून आणला गेला होता. यापूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्याचे नाव पश्चिम बंग करण्यासाठी विधानसभेचे सत्र बोलवण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यांनी हे नाव राज्याच्या इतिहासाशी जोडण्याच्या उद्येशाने हे पाऊल टाकलं जात आहे.
वाराणसीमध्ये प्रस्ताविक पश्चिम बंग भवनावरून देखील त्यांनी राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासोबतच बंगालमधून येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना राहण्याची सोय देखील होणार आहे.
शुभेंदु अधिकारी यांनी सांगितलं की राज्यात गोमातेला कापू देणार नाही अजूनही राज्यात चोरून गाय कापली जात आहे. सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. सत्तेत आल्यानंतर १९५० चा कॅटल अॅक्ट लागू केला आहे आणि या प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश देखील आहे असं सांगितलं. शुभेंदु अधिकारी यांनी सांगितलं की स्लॉटर हाऊस वेगळे आहेत. मात्र या प्रकारे गाईंना कापण्याची परवानगी नाही.
त्यांनी वय झालेल्या गायींसाठी देखील एक योजना आणली जाणार आहे. त्या योजनेअंतर्गत संस्था अशा गायींचे पालन पोषण करणार आहेत. त्या संस्थांना सरकारकडून १ लाख रूपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे.