

देवास (म.प्र.): एप्रिल महिन्याचा शेवट आणि सूर्याचा रौद्रावतार यामुळे सध्या रस्ते ओस पडताना दिसत आहेत. पारा ४२ अंशांच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका आगळ्यावेगळ्या वरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रव्ही लग्नाच्या वरातीत बैंड-बाजा आणि फटाक्यांची धूम असते; पण इथे चक्क चालते-फिरते एअर कुलर वरातींसोबत धावत होते.
अंग भाजून काढणाऱ्या उन्हावर मात करण्यासाठी केलेल्या या देशी जुगाडामुळे सोशल मीडियावर या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 'इन्व्हेंशन ऑफ द इयर' इंटरनेटवर या वरातीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला 'इन्व्हेंशन ऑफ द इयर' असे म्हटले आहे. भारतीय लोक जुगाड करण्यात जगात भारी आहेत.... अशा कमेंटस्चाही पाऊस पडत आहे. या कूल हायटेक वरातीचे वैशिष्ट्य म्हणजे, एका ट्रॉलीवर मोठे कुलर बसवण्यात आले होते. त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सोवत पोर्टेबल जनरेटरचा वापर करण्यात आला होता.
वरात पुढे सरकायची, तसा हा थंड हवेचा ताफाही वरातीवर गारव्याचे सिंचन करत जात असे. भरदुपारी लग्नाची मिरवणूक काढणे जिथे अशक्य वाटते, तिथे या कुलरमुळे वरातींना जणू एसो हॉलमध्ये असल्याचा फील येत होता. वाजत-गाजत निघालेल्या या वरातीत पाहुण्यांनी उन्हाच्या झळा विसरून थंड हवेच्या झोतात मनसोक्त ठेका धरला.
मुहूर्त भरदुपारी असल्याने अनेकदा उन्हामुळे वरातीचा उत्साह मावळतो. हीच अडचण ओळखून ही कुलर बरात संकल्पना प्रत्यक्षात आणली. या विशेष सुविधेसाठी ३ तासांचे सुमारे ३० ते ५० हजार रुपये आकारले जात आहेत.
'इन्व्हेंशन ऑफ द इयर'
इंटरनेटवर या वरातीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला 'इन्व्हेंशन ऑफ द इयर' असे म्हटले आहे. भारतीय लोक जुगाड करण्यात जगात भारी आहेत.... अशा कमेंटस्चाही पाऊस पडत आहे.