Lok Sabha Elections 2024 : १ कोटी मतदार ठरविणार मुंबईतील ११६ उमेदवारांचे भवितव्य

Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत (Lok Sabha Elections 2024) आज मतदान होत आहे. मुंबईतील सुमारे एक कोटी मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ११६ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत.

मुंबई शहर आणि उपनगर मिळून मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Elections 2024) एकूण ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई तर मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर- मध्य या मतदारसंघांचा समावेश होतो. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार, तर २ हजार ५२० मतदान केंद्रे, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार तर ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगही केले जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडावे यासाठी ५५ हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

मतदान केंद्रांवर अनेक सुविधा

मुंबईतील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप, प्रसाधनगृह, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका, स्वयंसेवक, व्हीलचेअर्स व विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांसाठी एक दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे दहा दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. बेस्टतर्फे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करणेकरिता १० लो फ्लोर बसेस उपलब्ध आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार

एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८
एकूण पुरुष :- १३ लाख ४३ हजार ९६९
एकूण स्त्रीः- ११ लाख ४६ हजार ०४५
एकूण तृतीयपंथीः- २२४
एकूण दिव्यांग मतदार- ५५४९
८५ वर्षांवरील एकूण मतदार- ५५ हजार ८१७

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार

एकूण मतदार :- ७४ लाख ४८ हजार ३८३
एकूण पुरुषः ४० लाख ०२ हजार ७४९
एकूण स्त्रीः ३४ लाख ४४ हजार ८१९
एकूण तृतीयपंथीः ८१५
एकूण दिव्यांग मतदार- १६ हजार ११६
८५ वर्षांवरील एकूण मतदार ९८ हजार २६३

दृष्टिक्षेपात पाचवा टप्पा

एकूण लोकसभा मतदार संघ – १३
मतदारसंघांची यादी – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे,
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मुंबई दक्षिण
एकूण उमेदवार – २६४
एकूण मतदान केंद्रे- २४ हजार ७५९
एकूण मतदार – २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४
एकूण पुरुष मतदार- १ कोटी ३१ लाख ३८ हजार ५२६
एकूण महिला मतदार- १ कोटी १५ लाख २८ हजार २७८

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news