

'मिस ऋषिकेश' (Miss Rishikesh ) सौंदर्य स्पर्धेची रंगीत तालीम शुक्रवारी (दि.३) राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटना (Rashtriya Hindu Shakti Sangathan) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. ही स्पर्धा 'उत्तराखंडच्या संस्कृतीच्या विरोधात' असल्याचा आक्षेप घेत त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेश करून गोंधळ घातला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राघव भटनागर हे महिलांनी परिधान केलेले कपडे 'उत्तराखंडच्या संस्कृतीच्या (संस्कृती)' विरोधात असल्याचे सांगत आहे. तर स्पर्धक भटनागर यांना जोरदार विरोध करताना तसेच त्यांच्याकडून होत असलेल्या चित्रीकरणावर आक्षेप घेताना दिसत आहेत.
लायन्स क्लब रॉयलचे संचालक धीरज मखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून लायन्स क्लब रॉयलच्या वतीने 'मिस ऋषिकेश'चे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम लायन्स दिवाळी उत्सव भाग म्हणून आयोजित केला जातो. स्थानिक महिलांना एक व्यासपीठ देण्यासाठी हा कार्यक्रम होतो. यातील पहिल्या पाच विजेत्या 'मिस उत्तराखंड' (Miss Uttarakhand) स्पर्धेत सहभागी होतात. शुक्रवारी दुपारी स्पर्धक आणि कोरिओग्राफर्स तालीम करत असताना संघटनेचे तीन सदस्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटनचे राघव भटनागर यांनी महिलांनी परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राघव भटनागर हे महिलांनी परिधान केलेले कपडे 'उत्तराखंडच्या संस्कृतीच्या (संस्कृती)' विरोधात असल्याचे सांगत आहे. तर स्पर्धक भटनागर यांना जोरदार विरोध करताना तसेच त्यांच्याकडून होत असलेल्या चित्रीकरणावर आक्षेप घेताना दिसत आहेत. हा कार्यक्रम होऊ देणार नाही. तुम्ही हे तुमच्या घरी करा," असेही सांगतात. कार्यक्रमाचे समन्वयक हे पालकांच्या संमतीने होत असल्याचे सांगत असल्याचे सांगतात. तरीही, भटनागर आपल्या मतावर ठाम राहत उत्तराखंड साखर्या पवित्र शहरात त हे चालणार नाही," असे म्हणत कार्यक्रमाला विरोध करताना दिसतात.
'मिस ऋषिकेश' स्पर्धेतील स्पर्धकांपैकी एक असणार्या मुस्कान शर्मा हिने 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सांगितले की, आपली संस्कृती आपण परिधान केलेल्या कपड्यांवरून ठरवता येत नाही. हा देश विविध संस्कृतींचा आहे. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. समोरची व्यक्ती काय म्हणतेय हे ऐकणेही महत्त्वाचे आहे. परदेशी लोक ऋषिकेशला भेट देतात, ते उत्तराखंडमध्ये आहेत म्हणून आम्ही त्यांना त्यांचे कपडे बदलण्यास सांगत नाही. 'मिस ऋषिकेश' स्पर्धा ही तरुणीच्या करिअरला मदत करते, असा दावाही तिने केला. दरम्यान, नियोजित कार्यक्रमानुसार 'मिस ऋषिकेश' स्पर्धा शनिवारी पार पडली. या स्पर्धेतपूर्वी झालेल्या वादावादीबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. दोन्ही बाजूंनी वाद मिटला, असे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले.
'मिस ऋषिकेश' स्पर्धेला आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. या संघटनेची स्थापना जानेवारी २०१७मध्ये झाली आहे. उत्तराखंडमध्ये 'लव्ह जिहाद' (love jihad) विरोधी कायद्यांना पाठिंबा देऊन 'धर्मांतराला' विरोध करत असल्यचा संघटनेचा दावा आहे. यापूर्वीही या संघटनेच्या वतीने मुझफ्फरनगरमधील एका भूखंडाचा संबंध पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या कुटुंबाशी जोडला होता, ज्यामुळे तो भूखंड 'शत्रू मालमत्ता' म्हणून घोषित करण्यात आला होता.