viral video | आजोबांच्या पहिल्याच व्लॉगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ७२ तासांत २.९ कोटी व्ह्यूज! काय आहे या व्‍हिडिओमध्‍ये?

इन्स्टाग्रामवर मिळाले २० लाखांहून अधिक लाईक्स, फॉलोअर्सची संख्या ६४ हजारांच्या पुढे
viral video | आजोबांच्या पहिल्याच व्लॉगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ७२ तासांत २.९ कोटी व्ह्यूज! काय आहे या व्‍हिडिओमध्‍ये?
Published on
Updated on

First vlog has gone viral on Instagram

नवी दिल्‍ली : सोशल मीडियावर कोणतीही गोष्‍ट व्‍हायरल होईल हे अकल्‍पनीय आहे. लाईक्‍स आणि कमेंट्सच्या या जगात एका क्षणात एखाद्‍याचे संपूर्ण जगणंच बदलतं. असाचा काहीसा अनुभव उत्तर प्रदेशमधील ७० वर्षीय आजोबांना आला आहे. त्‍यांनी सहज नवीन काही तरी शिकण्‍याच्‍या वृत्तीतून आपला पहिलाच 'व्लॉग' (Vlog) सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता तो तुफान व्हायरल झाला. अवघ्या ७२ तासांत या व्हिडिओला २.९ कोटींहून अधिक व्ह्यूज् मिळाले आहेत.

"मला व्लॉग बनवता येत नाही, पण..."

विनोद कुमार शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर आपला पहिला व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि साध्या भाषेत आपली ओळख करून दिली. ते म्हणतात, "माझे नाव विनोद कुमार शर्मा आहे. मी उत्तर प्रदेशमध्‍ये राहतो. सोशल मीडियावर व्लॉग कसा बनवायचा हे माहित नाही; पण निवृत्तीनंतरचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. आशा आहे की, तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि मी हे काम पुढे सुरू ठेवू शकेन."

viral video | आजोबांच्या पहिल्याच व्लॉगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ७२ तासांत २.९ कोटी व्ह्यूज! काय आहे या व्‍हिडिओमध्‍ये?
Shinde Raut Viral Video: संजय राऊत समोर येताच शिंदेंनी केला नमस्कार; तब्येतीची विचारपूस अन्..., व्हिडिओ व्हायरल

साधेपणाने जिंकली मने, सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव

विनोद कुमार शर्मा यांच्‍या साधेपणाने आणि नम्रतेने नेटीझन्सची मने जिंकली आहेत. चकाचक आणि एडिटिंगचा भरमार असलेल्या आजच्या सोशल मीडियाच्या युगात आजोबांचा साधेपणाचा नैसर्गिक भाव लोकांना भावला आहे. आजोबांच्या या पहिल्याच प्रयत्नाला इन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६४ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यांच्या या व्हिडिओची दखल अभिनेते अनुपम खेर आणि जय भानुशाली यांनीही घेतली आहे. जय भानुशालीने कमेंट करत म्हटले की, "तुमचा पहिला व्लॉग खूप आवडला, आता पुढच्या व्लॉगची वाट पाहत आहे."

viral video | आजोबांच्या पहिल्याच व्लॉगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ७२ तासांत २.९ कोटी व्ह्यूज! काय आहे या व्‍हिडिओमध्‍ये?
Viral Video : चाहत्यांनी ओलांडली मर्यादा! रोहित शर्माची 'प्रतिक्रिया' सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नेटीझन्स झाले भावूक

आजोबांचा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची आठवण झाली. हजारो सकारात्मक कमेंट्सचा या व्हिडिओवर पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले, "आजोबा, तुम्ही सिद्ध करून दाखवले की शिकण्यासाठी वय आडवे येत नाही." तर दुसऱ्या एकाने त्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले की, "तुमचे विचार प्रेरणादायी आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news