Viral News: ६.६ फूट उंचीचा कंडक्टर, तिकीट काढताना छताला लागायचं डोकं, अखेर महामंडळाने घेतला मोठा निर्णय

पोलीस भरती असो की सैन्य भरती अर्धा सेंटीमीटर उंची देखील महत्वाची असते. पण कधीकधी जास्त उंची अडथळा ठरू शकते.
Viral News
Viral Newsfile photo
Published on
Updated on

Viral News Telangana RTC tall bus conductor

हैदराबाद: पोलीस भरती असो की सैन्य भरती अर्धा सेंटीमीटर उंची देखील महत्वाची असते. पण कधीकधी जास्त उंची अडथळा ठरू शकते. याचा प्रत्यय तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एका बस कंडक्टरला आला आहे. ६ फूट ६ इंच उंची असलेल्या या कंडक्टरला बसमध्ये खाली वाकून तिकीट काढावे लागत. अनेकजण त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करत. अखेर त्याला होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन, प्रशासनाने त्यांची बदली आता अन्य विभागांत केली आहे.

Viral News
Viral Video | ट्रक ड्रायव्हरला प्रत्‍येक कामात अचूकपणे मदत करणार कुत्रा पाहून अचंबित व्हाल!

मेहदीपट्टणम आगारात कार्यरत असलेले अमीन अहमद अन्सारी यांची उंची १९८ सेंटीमीटर (६ फूट ६ इंच) आहे. एसटी बसमधील छताची उंची आणि प्रवाशांच्या गर्दीतून वावरताना होणारी अडचण यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना प्रचंड त्रास होत होता. बसमध्ये उभे राहताना सतत वाकावे लागत असल्याने त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. यापूर्वी त्यांना वर्षभरासाठी पर्यायी काम देण्यात आले होते. मात्र, २८ एप्रिल रोजी ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा बसमध्ये ड्युटी देण्यात आली, ज्यामुळे त्यांचा शारीरिक त्रास बळावला.

प्रशासनाकडून तातडीने दखल

अन्सारी यांची प्रकृती आणि उंचीमुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, ५ मे रोजी महामंडळाच्या मुख्यालयातून त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. नव्या आदेशानुसार, त्यांना बसमधील ड्युटीतून मुक्त करण्यात आले असून त्यांची नियुक्ती 'बस पास विभाग' किंवा 'राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ' येथील केंद्रावर करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप आणि बसची रचना ही सर्वसाधारण उंची लक्षात घेऊन केलेली असते. मात्र, अन्सारी यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा रचनेमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तेलंगणा महामंडळाने दाखवलेली ही संवेदनशीलता अन्य विभागांसाठी आदर्श असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. कर्मचाऱ्याच्या आरोग्याचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Viral News
Viral Video: भर मांडवात नवरीने नवरदेवाला सोडून प्रियकराला घातला हार अन् गेली पळून; पाहुण्यांचा राडा! व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news