Jagdeep Dhankhar | न्यायमूर्ती वर्मांच्या घरात सापडलेली रक्कम कोणाची? कुठून आली? उपराष्ट्रपती धनखड यांचा सवाल

Jagdeep Dhankhar | न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतरच्या नियुक्त्यांवर व्यक्त केली चिंता
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharx
Published on
Updated on

Vice President Jagdeep Dhankhar on cash found in Justice Yashwant Verma house

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या चर्चेमुळे देशात मोठा खळबळ उडाली असतानाच, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या प्रकरणावर भाष्य करत न्यायालयीन प्रणालीवरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय प्रगत कायदाशास्त्र विद्यापीठात (NUALS) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपराष्ट्रपती म्हणाले, “जर इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळली असेल, तर ती रक्कम कुठून आली? ती रक्कम भ्रष्ट आहे का? ती न्यायमूर्तींच्या शासकीय निवासस्थानी कशी पोहोचली? ही रक्कम कोणाची आहे?” अशा प्रश्नांची उत्तरे मिळवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdeep Dhankhar
Tirupati Tirumala news | तिरुपती येथे भाविकांना दररोज दोन वेळा मोफत मिळणार 'हा' खास पदार्थ

गुन्हा दाखल झालाय का?

मार्च महिन्यात, दिल्लीतील न्यायमूर्ती वर्मांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीत काही जळलेली पोती सापडली होती, ज्यामध्ये बँकेच्या नोटा होत्या.

या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने न्यायमूर्ती वर्मांची चौकशी केली आणि अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्यांना दोषी ठरवले. मात्र, स्वत: वर्मा यांनी या रकमेबद्दल अनभिज्ञता दर्शवली होती.

उपराष्ट्रपती धनखड यांनी या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल न झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले, "गुन्हा झालाय का? तर मग त्याची चौकशी हवी. एफआयआर नोंदवला गेला पाहिजे, कारण कुठल्याही गुन्ह्याची मुळाशी जायचे असेल, तर पोलिस तपास गरजेचा आहे."

Jagdeep Dhankhar
DY Chandrachud | माझं सामान पॅक केलं आहे; मुलींसाठी घरात ICU सेटअप असल्याने बंगला सोडण्यास विलंब...

न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतरच्या नियुक्त्यांवर चिंता

उपराष्ट्रपती धनखड यांनी न्यायाधीश निवृत्तीनंतर सरकारी पदांवर नियुक्ती मिळवतात यावरही प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले की, “सार्वजनिक सेवा आयोगाचे सदस्य, महालेखापरीक्षक, निवडणूक आयुक्त यांना निवृत्तीनंतर सरकारी पदे स्वीकारण्यास मज्जाव आहे. मात्र न्यायाधीशांच्या बाबतीत ही मर्यादा का नाही?”

ते पुढे म्हणाले, "सर्व न्यायाधीशांना पद मिळवून देता येत नाही. जे काहींना पदे दिली जातात, त्यातून ‘पिक अ‍ॅन्ड चूज’ सुरू होते. आणि जेव्हा ‘पिक अ‍ॅन्ड चूज’ होते, तेव्हा संरक्षकता आणि पक्षपात निर्माण होतो. हा प्रकार न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर गभीर परिणाम करू शकतो."

Jagdeep Dhankhar
Asim Munir President Pakistan | पाकिस्तानात उलथापालथ? लष्करप्रमुख असीम मुनीर बनणार राष्ट्रपती? पुन्हा लष्करी उठावाची शक्यता...

न्यायमूर्ती वर्मा यांची सध्याची स्थिती

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती वर्मा यांची मूळ न्यायालय, म्हणजेच अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. मात्र, तेथेही त्यांना कोणतेही न्यायालयीन कार्य दिले गेलेले नाही.

त्यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news