उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राहुल गांधींवर निशाणा

आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी धारेवर
Jagdeep Dhankhad Critisized Rahul gandhi
उपराष्ट्रपती जगदीप धनखड Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून सुरू असलेली टीका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर अर्धा डझनहून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

Jagdeep Dhankhad Critisized Rahul gandhi
"भारत जोडो यात्रा मी माझ्‍याविरोधात..." : अमेरिकेत राहुल गांधी असं का म्‍हणाले?

उपराष्ट्रपती म्हणाले की, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने देशाच्या शत्रूंशी हातमिळवणी करण्यापेक्षा निंदनीय, घृणास्पद आणि असह्य काहीही असू शकत नाही. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वादग्रस्त मुस्लिम खासदार इल्हान उमर यांच्या भेटीचा संदर्भ देत त्यांनी हा निशाणा साधला. इल्हान उमर भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरलाही भेट दिली आणि पीओकेमध्ये भारताविरोधात बरीच वक्तव्ये केली आहेत. इल्हान यांनी हिंदूफोबियाबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत.

Jagdeep Dhankhad Critisized Rahul gandhi
राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला ऊर्जा

राहुल गांधी यांनी इल्हान यांची भेट घेतल्याने केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. उपराष्ट्रपतींनीही हावभावातून राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना राष्ट्रहिताचे ज्ञान नाही याचे मला दु:ख आणि वेदना होत आहेत. राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना भारताविषयी माहिती नाही. त्यांना ना आपल्या राज्यघटनेचे ज्ञान आहे ना त्यांना राष्ट्रहिताचे ज्ञान आहे. ते म्हणाले की जर आपण खरे भारतीय असू आणि आपला आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण कधीही राष्ट्राच्या शत्रूंची बाजू घेणार नाही. आपण सर्वजण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news