राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला ऊर्जा

दिल्ली दरबारी वाढले सांगलीचे वजन; प्रचाराचा नारळ फोडल्याची चर्चा
Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला ऊर्जा file photo
Published on
Updated on

सुरेश गुदले, सांगली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सांगली जिल्ह्यात दौरा झाला. त्यानंतर एका अर्थाने विधानसभेच्या प्रचाराचा नारळच फुटला, अशी प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त झाली. ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे, त्यांचे अन्य काही नेते, कार्यकर्ते अनुपस्थित राहिले. बाकी महाविकास आघाडी मंचावर होती. देशासमोरील राजकीय-सामाजिक स्थितीची राहुल गांधी यांनी चिरफाड केली. 'अगोदर चुका करता आणि मग माफी मागण्याची वेळ येते,' अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. त्यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसला ऊर्जा मिळाली. कार्यकर्ते रिचार्ज झाले.

लोकसभेच्या सांगली मतदारसंघाची राज्यभर गाजली. बहुचर्चित आणि लक्षवेधी अशी ही निवडणूक झाली. निवडणूक दारात आली तरी जागा वाटपाचा विदा सुटता सुटला नाही. अखेर कचिसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लदत दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात पुन्हा कग्रेसचा खासदार झाला. आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत, लोकसभेसारखाच सांगली निवडणूक पुन्हा बहुवर्णित आणि लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. लोकसभेवेळी काँग्रेस एकसंधपणे लढली आणि जिंकलीही. तो प्रयोग विधानसभेला पुन्हा होणार का, पाकडे आता राज्याचे लक्ष असेल. अगदी दिल्लीपर्यतच्या बातम्यांत सांगली पुन्हा गाजत राहील, असे आजचे चित्र आहे. लोकसभेला सांभिक प्रयत्नातून जे यश मिळाले, त्यामुळे कॉग्रेसला खूप वर्षांनंतर बालेकिल्ल्यात पुन्हा वळ मिळाले, कार्यकत्यांना उमेद आली, मरगळ झटकली गेली.

या निवडणुकीत जिल्ह्याचे नेते म्हणून माजी मंत्री आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नाचावर शिक्कामोर्तब झाले. हे होत असताना आमदार जयंत पाटील मात्र नेतृत्वाच्या लडाईत बॅकफूटवर गेले. अनेकजण त्यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' म्हणून करतात. 'जिल्ह्याचे नेठे' म्हणूनही करतात. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी पडद्यामागे राक्बलेल्या कोक्ट कार्यक्रमाची चर्चा पडद्यावर उघड उघड रंगली. 'सांगलीच्या जागावाटपात माझा काहीही संबंध नाही' या त्यांच्या विलंबाने केलेल्या खुलाशावर लोकांनी विश्वास ठेचला नाही, याऊलट समाज माध्यमात नेमका करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला, या विषयावर विनोद रंगले, लोकसभा निवडणुकीत एक झाले,

कग्रेिसचा जिल्ह्याचा नेता ठरला, कांग्रेस एकसंध पाहायला मिळाली. यानंतर ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या व 'लोकतीर्थ' या त्यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते कडेगावात हा सोहळा पार पडला, त्यासाठी काँग्रेस आणि पतंगराव कदम यांच्यावर प्रेम करणाऱ्या गर्दीचा महापूर वाहिला. महराष्ट्राच्या डीएनएमध्येच काँग्रेस आहे, अशी भूमिका राहुल गांधी वांनी मांडली, त्यामुळे कॉग्रेसला, कार्यकत्यांना बळ मिळाले.

अवघ्या तीन टक्क्यांनी पराभूत

माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी राहुल यांच्या दौग्याचे नेमके आणि नेटके नियोजन करत अचूक वेळ साधली. काँग्रेस शहर-जिलाध्यक्ष पृथ्वीराज पाटील सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. सुमारे तीस वर्षे ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ते अवघ्या तीन टक्क्यांनी पराभूत झाले होते. ८७ हजार मते त्यांनी मिळविली होती. ती मिळविण्यासाठीही त्यांना पुरेसा अबधी मिळाला नव्हता, पराभूत झाले म्हणून ते थांबले नाहीत. आता पृथ्वीराज पाटील यांना आमदार करणारच', अशी खाही आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर कार्यक्रमात पापूर्वी दिलेली आहे. आता त्यांच्या पुढील कृतीकडे सांगलीकरांचे लक्ष असेल, लोकसभेप्रमाणेच विधानसभानिवडणुकीतही काँग्रेस एकसंधपणेचा लवेल, अशी जिल्ह्यातील नेत्यांची सध्या तरी भाषा आहे. त्यांची कृती आणि परिणाम पाहण्यासाठी थोडे आंबावे लागेल.

घरातील वाद सोडविण्याची खरी कसोटी

केवळ जिल्ह्याचे नेतृत्र करून आ. डॉ. विश्वजित कदम यांना थांबायचे नाही. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. त्यासाठी ते जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध कशी राहील, यासाठी प्रयत्न करतील, अशी अटकळ आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे सांगलीच्या विधानसभेच्या जागेचा पेच ते निर्माण होऊ देणार नाहीत आणि झालाच तर त्यावर मात करून पुढे जातील, अशी अपेक्षा आहे. पृथ्वीराज पाटील विरुद्ध जयश्री पाटील हा घरातला साद त्यांना लवकरात लवकर सोडवावाच लागेल आणि हीच त्यांची खरी कसोटी असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news