Congress: लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी वेणुगोपाल ‘अधीर’

Congress
Congress

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: केंद्रात आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा एनडीए आणि इंडिया आघाडीकडून केला जात असतानाच आता निवडणूक निकालात मिळणाऱ्या संभाव्य यशानुसार पक्षातील महत्वपूर्ण पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सत्ता मिळाली नाही तर लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला निश्चितच मिळेल, या खात्रीने काँग्रेसमधील (Congress) दोन नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. 

Congress: लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये वाद

काँग्रेसचे गट नेते अधीररंजन चौधरी आणि सरचिटणीस वेणूगोपाल यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी सुरू केली आहे. वेणुगोपाल यांनी कांग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चौधरी यांच्यावर अलीकडेच निशाणा साधला होता. परिणामी कांग्रेसची पश्चिम बंगाल शाखा आणि दिल्लीच्या केंद्रीय शाखेमध्ये (Congress) वाद पेटल्याचे बघायला मिळाले. 

निर्णय घेण्याचे अधिकार अधीररंजन यांना नाहीत; अध्यक्षांनी सुनावले

कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पोस्टरवर शाईफेक केली होती. प्रकरण चिघळताच काँग्रेस अध्यक्षांनी आपले आधीचे वक्तव्य मागे घेऊन चौधरी हे पश्चिम बंगालमधील एक लढवय्ये आणि जबाबदार नेते असल्याचे म्हटले होते. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत राहतील की नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार अधीररंजन चौधरी यांना नसल्याचे विधान खर्गे यांनी केले होते. त्यापूर्वी अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी इंडिया आघाडी (Congress) सोडून गेल्या आहेत,असे विधान केले होते.  

अधीररंजन यांना तीव्र प्रतिक्रिया देण्यामागे वेणुगोपाल यांचा हात

मल्लिकार्जून खर्गे यांनी अधीररंजन चौधरी यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया देण्यामागे वेणुगोपाल यांचा हात असल्याचे दिसून आले आहे. चौधरी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाच्या स्पर्धेतून बाद करण्यासाठी निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याची अथवा त्यांना पक्षातून बाजूला सारण्याची योजना वेणूगोपाल यांनी आखली होती. चौधरी निवडून आल्यास गांधी परिवाराकडून त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, या शक्यतेने वेणूगोपाल यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news