FASTag Annual Renewal
नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने टोल शुल्कासाठी फास्टॅग वार्षिक पास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून देशभरात फास्टॅग वार्षिक पास प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. वार्षिक पाससाठी नोंदणी करण्यासाठी नवीन फास्टॅग खरेदीची वाहनधारकांना गरज नाही. वाहनधारकाकडील विद्यमान फास्टॅगवरच वार्षिक पास सक्रिय करता येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सांगितले.
इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार देशात ३१ मे २०२५ पर्यंत १०.९७ कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. सर्व विद्यमान फास्टॅगवर पास सक्रिय करण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. फास्टॅग वाहनावर योग्यरित्या चिकटलेला असावा, वैध वाहन नोंदणी क्रमांकाशी जोडलेला असावा, काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) मध्ये टाकलेला नसावा, असे एनएचएआयने सांगितले. यासोबत इतर आणखी काही निकष असतील, त्यावर सध्या काम सुरु असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
वार्षिक पास फक्त राजमार्गयात्रा मोबाइल अॅप्लिकेशन आणि एनएचएआयच्या संकेतस्थळावरुन सक्रिय केला जाऊ शकतो.
वाहनाची पात्रता आणि संबंधित फास्टॅग पडताळल्यानंतर वार्षिक पास सक्रिय केला जाईल. यशस्वी पडताळणीनंतर, वाहनधारकाने राजमार्गयात्रा मोबाइल अॅप्लिकेशन किंवा एनएचएआयच्या संकेतस्थळाद्वारे वर्ष २०२५-२६ साठी ३ हजार रुपयांचे पेमेंट करावे लागेल. एकदा पेमेंटची पुष्टी झाली की, वार्षिक पास नोंदणीकृत फास्टॅगवर साधारणपणे २ तासांच्या आत सक्रिय केला जाईल.
हो. वार्षिक पास सक्रिय झाल्यानंतर करून, राजमार्गयात्रा अॅप्लिकेशन एसएमएस अलर्ट नोंदणीकृत मोबाइल नंबर येईल.
वार्षिक पास अनिवार्य नाही. विद्यमान फास्टॅगपद्धतीनुसार वाहनधारकांना टोलशुल्क भरता येईल. यासाठी त्यांनी प्रत्येक टोलनाक्यावरील शुल्क दरानुसार पेमेंट करावे लागेल.
वार्षिक पास सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० व्यवहार (ट्रिप्स) यापैकी जे आधी येईल तोपर्यंत वैध असेल. एकदा वार्षिक पास २०० ट्रिप किंवा एक वर्ष पूर्ण झाले की, तो आपोआप नियमित फास्टॅगचा वापर सुरु करेल. वार्षिक पास वापरणे सुरू ठेवण्यासाठी, वाहनधारकांना पुन्हा पेमेंट करुन सक्रिय करावा लागेल.
नाही. वार्षिक पास फक्त खाजगी बिगर व्यावसायिक कार, जीप, व्हॅनसाठी लागू आहे. कोणत्याही व्यावसायिक वाहनासाठी ही पद्धत वैध नसेल.
नाही. पास हस्तांतरणीय नाही आणि फक्त ज्या वाहनावर फास्टॅग चिकटवलेला आहे आणि नोंदणीकृत आहे त्यासाठीच वैध असेल. दुसऱ्या वाहनासाठी पास वापरल्यास निष्क्रिय करण्यात येईल.
फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोल नाके वार्षिक पास अंतर्गत येतात. राज्य सरकार किंवा स्थानिक संस्था, पार्किंग इत्यादींद्वारे व्यवस्थापित केलेल्या द्रुतगती महामार्ग, राज्य महामार्गावर नियमित टोल शुल्क लागू असेल.