मोठी बातमी | राज्यात सर्व वाहनांसाठी १ एप्रिलपासून फास्ट टॅग बंधनकारक

FASTag | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
The fast tag on the vehicle has simplified the toll collection process
वाहनावरील फास्ट टॅगमुळे टोलआकारणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आला आहे File Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना १ एप्रिलपासून फास्ट टॅग (FASTag ) अनिवार्य करण्याचा निर्णय आज (दि.७) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

१ एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. फास्ट टॅग कार्यरत नसेल, तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल, तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.

एमएसआरडीसीच्या अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

The fast tag on the vehicle has simplified the toll collection process
Thane | मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; विकेंडला पर्यटकांचा हिरमोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news