वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत...

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवणार आहे. वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केल्या जात आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच लोको पायलट आणि अटेंडंटच्या सुविधांचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. लोको कॅबमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि ट्रेनमध्ये धडक विरोधी चिलखत प्रणाली देखील आहे. याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथील वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीच्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.

वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार
वंदे भारत सुसाट!

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डिझाईन आणि आतील भाग अतिशय आकर्षक असून त्यात जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. ट्रेनमध्ये चार्जिंगसह वाचण्यासाठी प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक घोषणा आणि दृष्य स्वरूपात माहिती देण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आधुनिक पॅन्ट्री आहे. यासोबतच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी लवकरच सुरू होणार असून त्यानंतर ही ट्रेन देशातील विविध रेल्वे मार्गांवर चालवली जाणार आहे. वंदे भारत स्लीपर गाड्या लांब रेल्वे मार्गांवर चालवल्या जाणार आहेत.

वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार
जालना : वंदे भारत रेल्वे कोचची लातूरमध्ये होणार निर्मिती

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बेंगळुरू येथील वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीच्या ठिकाणी भेट दिली आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना हेही उपस्थित होते. वंदे भारत स्लीपरच्या निर्मितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी रेल्वेमंत्र्यांनी संवाद साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news