Vande Bharat Food Controversy | 'वंदे भारत'च्या प्रवाशाला डाळ-भातात आढळला कीडा; IRCTC ने विक्रेत्यावर ठोठावला १० लाखांचा दंड

Vande Bharat Food Controversy |सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, प्रवाशांनी व्यक्त केली चिंता
Vande Bharat Food Controversy
प्रातिनिधिक छायाचित्र.file photo.
Published on
Updated on

Vande Bharat Food Controversy

अहमदाबादहून वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईतील प्रवाशाला जेवणात कीडा आढळल्याने मोठा धक्का बसला. हा संतापजनक अनुभव त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. आपण प्रवास करत असलेल्या डब्यात अशा दोन घटना घडल्या. त्यामुळे सर्व प्रवाशांनी जेवण करणे थांबवल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून, विक्रेत्याला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्रवाशाने शेअर केला व्हिडिओ

संबंधित प्रवाशाने 'X' वर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये डाळ-भाताचा एक जेवणाचा डबा दिसत आहे. यामध्ये झुरळासारखा दिसणारा एक कीडा आढळला. जेवण पुरवणारा विक्रेता हा 'RK ग्रुप'चाच एक भाग असणाऱ्या 'M/S वृंदावन फूड प्रॉडक्ट्स' होता. प्रवाशाने संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत संबंधित विक्रेत्याच्या जागेवर छापा टाकण्याची विनंती केली. मला खात्री आहे की हे जेवण FSSAI च्या मानकांनुसार तयार केले जात नाही. यामध्ये संबंधित दोषी आढळले, तर त्यांचा परवाना रद्द केला गेला पाहिजे. आशा आहे की हे प्रकरण लाच देऊन मिटवले जाणार नाही."

Vande Bharat Food Controversy
indian railway | इराण युद्धाचा भारतीय रेल्‍वेवरही 'इफेक्‍ट', परवानाधारक विक्रेत्यांना देण्‍यात आला 'हा' आदेश

सेवा पुरवठादाराला १० लाख रुपयांचा दंड

या घटनेवर प्रतिक्रिया देताना IRCTC ने स्पष्ट केले की, "संबंधित सेवा पुरवठादाराला १० लाख रुपयांचा मोठा दंड आणि कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच स्वच्छता आणि कीटक नियंत्रणासाठी स्वयंपाकघर सील करण्यात आले आहे."

Vande Bharat Food Controversy
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 36 लाख वाहनचालकांवर कारवाई; 599 कोटींचे ई-चलान

IRCTC ने व्यक्त केली दिलगिरी

"प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. स्वच्छता आणि प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे IRCTC ने म्हटले आहे.

Vande Bharat Food Controversy
crime news: प्रचार साहित्य चिकटवल्याप्रकरणी “बंगाली बाबा”ला अटक; आरपीएफ पथकाने केली कारवाई

प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

संबंधित पोस्ट 'X' वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, अनेक प्रवाशांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तीच तीच निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होत आहे. हा प्रश्न नेमका कोणत्या टप्प्यावर सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका बनणार आहे? प्रवाशांना केवळ वारंवार दिल्या जाणाऱ्या दिलगिरीपेक्षा अधिक चांगल्या सेवेचा अधिकार आहे, असे रेल्वे प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news