Vande Bharat: वंदे भारत ट्रेनमधील जेवणावर पुन्हा प्रश्नचिन्ह, महिलेच्या सुजलेल्या ओठांचा फोटो व्हायरल, काय आहे प्रकरण?

Vande Bharat Food Controversy: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणामुळे अॅलर्जी झाल्याचा प्रवासी महिलेचा दावा समोर आला आहे. फोटो आणि मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले आहे.
Vande Bharat Food Controversy
Vande Bharat Food ControversyPudhari
Published on
Updated on

Vande Bharat Food Controversy: देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान मानली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण आहे ट्रेनमधील जेवण. रांची येथील एका महिलेने दावा केला की ट्रेनमध्ये दिलेल्या जेवणामुळे तिला अॅलर्जी झाली. या घटनेनंतर सोशल मीडियावर फोटो आणि मेडिकल रिपोर्ट व्हायरल होताच प्रकरण तापलं आहे.

नेमकं काय घडलं?

रांचीतील आयुषी सिंह यांनी 27 मार्च रोजी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22500) मध्ये E1 कोचमध्ये प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी ट्रेनमध्ये दिलेलं जेवण घेतलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जेवण केल्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना अॅलर्जी झाली आणि त्यांचे ओठ मोठ्या प्रमाणात सूजले. एवढंच नाही, तर त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही जुलाबाचा त्रास सुरू झाला.

Vande Bharat Food Controversy
Vande Bharat Food ControversyPudhari

फोटो आणि मेडिकल प्रिस्क्रिप्शन व्हायरल

आयुषी यांनी या घटनेचे फोटो आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्यांचे ओठ सूजलेले दिसत आहेत. त्यांनी दावा केला की ही, अॅलर्जी गंभीर होती आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती आणखी बिघडली असती. त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेबरोबरच ट्रेनमधील पाण्यावरही शंका व्यक्त केली आहे.

Vande Bharat Food Controversy
Tech Companies: इराणच्या धमकीमुळे अमेरिका टेन्शनमध्ये; ॲपल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 प्रमुख कंपन्यांवर हल्ला करणार

IRCTC ची प्रतिक्रिया

या प्रकरणावर Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने स्पष्टीकरण दिलं आहे. IRCTC च्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी दिलेल्या जेवणाची तपासणी करण्यात आली होती आणि सर्व काही समाधानकारक होतं.

तसेच, इतर कोणत्याही प्रवाशाकडून तक्रार आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. तरीही, आयुषी यांनी IRCTC च्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलं नाही. त्यानंतर IRCTC ने त्यांच्याकडून अधिक माहिती मागवून तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Vande Bharat Food Controversy
Thalapathy Vijay Net Worth: आलिशान गाड्या, घर, सोनं, हिरे, बँक बॅलन्स.... थलपती विजयची संपत्ती किती?

वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये अशी घटना घडल्याचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे, कारण यात फक्त एका प्रवाशाचा प्रश्न नसून लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news