Medical College Gas Leak : शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये गॅस गळती, दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरी; एका रुग्णाच्या मृत्यूची शक्यता

चेंगराचेंगरीत एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, परंतु डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी कोणाच्याही मृत्यूचे वृत्त नाकारले आहे.
uttar pradesh news gas leak in shahjahanpur government medical college patients evacuated
Published on
Updated on

uttar pradesh gas leak in shahjahanpur government medical college

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या ओटीमध्ये रसायन सांडल्याने आणि गॅस गळती झाल्याने चेंगराचेंगरी झाली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुरक्षित स्थळी पळू लागले. चेंगराचेंगरीत एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, परंतु डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी कोणाच्याही मृत्यूचे वृत्त नाकारले आहे. रविवारी (दि. 25) ही दुर्घटना घडली.

या घटनेनंतर रुग्णांना ताबडतोब वॉर्डाबाहेर हलवण्यात आले. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ऑपरेशन थिएटरमधून गॅसचा धूर येत असल्याचे सांगण्यात आले.

uttar pradesh news gas leak in shahjahanpur government medical college patients evacuated
Mann ki Bat|ऑपरेशन सिंदूर म्हणजे बदलत्या भारताची प्रतिमा

शाहजहांपूरचे डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी घटनेची पुष्टी केली आणि गॅस गळती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

uttar pradesh news gas leak in shahjahanpur government medical college patients evacuated
Tej Pratap Yadav : लालू प्रसाद यादवांनी मुलगा तेजप्रतापची केली पक्षातून हकालपट्टी

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फॉर्मेलिन रसायनापासून बनवलेल्या गॅसची गळती झाली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखून रुग्णालयातील कर्मचा-यांनी तत्काळ रुग्णांना वॉर्डाबाहेर काढले. सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विशेष स्प्रे फवारून गॅसचा प्रभाव कमी केला. वायूमुळे त्यांना डोळ्यांत जळजळ होत होती आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, असे रुग्णांनी सांगितले.

uttar pradesh news gas leak in shahjahanpur government medical college patients evacuated
NDA CM Meet : 'एनडीए' मुख्‍यमंत्री बैठकीत जातीय जनगणनेवर चर्चा, केंद्राच्‍या निर्णयाचे कौतुक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news