US- Iran war |भारतातील परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढीसाठी एफआरआरओशी संपर्क करण्याचे आवाहन

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची महत्त्वाची सूचना
How to apply for e-vis
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. प्रवास योजनांमध्ये बदल करावा लागलेल्या भारतातील परदेशी नागरिकांनी व्हिसा मुदतवाढ किंवा वास्तव्य नियमित करण्यासाठी जवळच्या विभागीय परदेशी नोंदणी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पश्चिम आशियातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे अनेकांना नियोजित प्रवास पुढे ढकलावा लागला आहे. अशा नागरिकांना भारतात कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी संबंधित एफआरआरओ कार्यालय आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यास मदत करेल. संपर्क तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news