UPSC Prelims Exam 2025
UPSC Prelims Exam 2025 File Photo

UPSC Answer Key : पूर्वपरीक्षेनंतर तात्‍काळ Answer Key जाहीर केली जाईल : 'युपीएससी'ची सुप्रीम कोर्टात माहिती

'यूपीएससी'च्या या नवीन निर्णयामुळे लाखो उमेदवारांना मिळणार दिलासा
Published on

UPSC Answer Key : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या पूर्वपरीक्षाची उत्तरपत्रिका ( Answer Key) आता परीक्षेनंतर तत्‍काळजाहीर केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सर्वोच्च न्यायालयात दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगातील परीक्षांमध्‍ये अधिक पारदर्शकतेची मागणी करणार्‍या याचिकेवरील सुनावणीवेळी आयोगाने उत्तर देताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. दरम्‍यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुमारे एक वर्ष चालते. मुख्य परीक्षेला पात्र न ठरलेल्‍या उमेदवारांना त्यांचे गुण, कट-ऑफ किंवा मूल्यांकन याबद्दल माहिती मिळू शकत नाही. यामुळे त्यांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याची संधी वंचित राहते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) या नवीन निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत प्रक्रिया काय होती?

आतापर्यंत, UPSC पारंपारिकपणे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उत्तरपत्रिका, गुण आणि कट-ऑफ प्रकाशित करत असे. तथापि, या नवीन निर्णयामुळे, उमेदवारांना परीक्षेनंतर लगेचच त्यांचे उत्तर तपासण्याची संधी मिळेल.

UPSC Prelims Exam 2025
UPSC news: थोडक्यात युपीएससी हुकलेल्या विद्यार्थ्यांना 'प्रतिभा सेतू'द्वारे मिळणार मोठी संधी; 'मन की बात'मध्ये PM मोदींचे प्रतिपादन

UPSC ने सर्वोच्‍च न्‍यायालयात काय सांगितले?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की,तात्पुरती उत्तरपत्रिका परीक्षेनंतर जाहीर केली जाईल आणि उमेदवारांकडून आक्षेप मागवले जातील. हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत निवेदने किंवा आक्षेप सादर करण्यास सांगितले जाईल. प्रत्येक आक्षेपात किमान तीन प्रामाणिक स्रोतांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सर्व आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या समितीद्वारे केली जाईल, जी अंतिम उत्तरपत्रिका तयार करेल. या आधारे निकाल जाहीर केले जातील.तथापि, सादर केलेले स्रोत प्रामाणिक आहेत की नाही हे आयोग ठरवेल. प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की आयोग शक्य तितक्या लवकर या प्रक्रिया सुरू करण्याचा मानस आहे.

UPSC Prelims Exam 2025
UPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले डॉ. अजय कुमार आहेत कोण? केंद्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली

लाखो उमेदवारांना मिळणार दिलासा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुमारे एक वर्ष चालते. मुख्य परीक्षेला पात्र न ठरलेल्‍या उमेदवारांना त्यांचे गुण, कट-ऑफ किंवा मूल्यांकन याबद्दल माहिती मिळू शकत नाही. यामुळे त्यांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याची संधी वंचित राहते. यूपीएससीच्या या नवीन निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news