UPSC २०२४ अंतिम निकाल लवकरच होणार जाहीर

upsc 2024 result | १०५६ जागा, २८४५ उमेदवार, निकाल कसा चेक कराल?
upsc 2024 result
UPSC २०२४ अंतिम निकाल लवकरच होणार जाहीर File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: upsc 2024 result | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२४ मध्‍ये घेतलेल्‍या परीक्षा अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहे. हजारो इच्छुकांच्‍या नजरा यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in वर खिळल्‍या आहेत. या परीक्षेसाठी २८४५ उमेदवारांपैकी १०५६ उमेदवारांची निवड होणार आहे.

'अशी' पार पडली पूर्व आणि मुख्य परीक्षा

नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र होते. पूर्व परीक्षा १६ जून रोजी घेण्यात आली आणि निकाल १ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आयोगाने २०, २१, २२, २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी दोन शिफ्टमध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षा घेतली. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत घेण्यात आली. नागरी सेवा मुख्य परीक्षा पेपर १ ने सुरू झाली आणि पेपर ६ आणि पेपर ७ ने संपली.

लवकरच युपीएससीचा अंतिम निकाल

७ जानेवारी ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत २८४५ उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखत घेण्यात आली. ती दोन सत्रांमध्ये पार पडली: पहिले सत्र सकाळी ९ वाजता आणि दुसरे सत्र दुपारी १ वाजता. यापूर्वी मुख्य परीक्षेचा निकाल ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर लवकरच युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल २०२४: कसे तपासायचे

१. UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.

२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा अंतिम निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.

३. एक नवीन PDF फाइल उघडेल जिथे उमेदवारांना त्यांचे रोल नंबर तपासावे लागतील.

४. फाइल डाउनलोड करा आणि पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news