Crime News: बटाट्याची भाजी वाढल्याने पती संतापला; पत्नीला चावा घेत डोक्यात दगड घातला

रात्रीच्या जेवणात बटाट्याची भाजी वाढल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका पतीने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Potato curry
Potato curryFile Photo
Published on: 
Updated on: 

Crime News

भदोही: रात्रीच्या जेवणात बटाट्याची भाजी वाढल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका पतीने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्याने पत्नीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेत तिच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली.

भदोही जिल्ह्यातील डोमामपूर गावात १२ ऑक्टोबरला ही घटना घडली. प्रीती विश्वकर्मा (वय ४०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नवा असून, पोलिसांनी तिने दिलेल्या तक्रारीवरून पती ओम प्रकाश विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Potato curry
Crime News : 'पार्टी दे, नाहीतर संपवतो'; अल्पवयीनने मित्राच्या छातीत खुपसला चाकू

सर्कल ऑफिसर राजीव कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ओमप्रकाशने पत्नीकडे जेवण मागितले. प्रीतीने त्याला ताटात बटाट्याची भाजी वाढली. यावरून ओमप्रकाशने संतापून ‘बटाट्याचीच भाजी का केलीस?’ असा जाब विचारला. त्यावर प्रीतीने ‘घरात जे उपलब्ध होते तेच शिजवले,’ असे उत्तर दिले. या साध्या उत्तराने संतापलेल्या ओमप्रकाशचा पारा चढला आणि त्याने प्रीतीवर हल्ला केला.

हल्ल्यादरम्यान आरोपीने पत्नीच्या अंगावर ठिकठिकाणी चावा घेतला आणि जमिनीवर पडलेल्या दगडाने तिच्या डोक्यावर एकामागून एक वार केले. प्रीती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलांचा आक्रोश

आई रक्ताच्या थारोळ्यात आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेली पाहून तिच्या मुलांनी घाबरून आक्रोश केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांनी प्रीतीला तातडीने जवळच्या समुदाय आरोग्य केंद्रात दाखल केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी तिला रात्रीच जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हा दाखल, आरोपी पसार

जखमी प्रीतीने बुधवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती ओमप्रकाश विश्वकर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) (हत्या करण्याचा प्रयत्न) आणि ३५२ (शांतता भंग करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Potato curry
Crime News : आमच्या भागात राहायला का आले ? म्हणत तरुणाला भोसकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news