Crime News : आमच्या भागात राहायला का आले ? म्हणत तरुणाला भोसकले

हसूल पोलिसांत दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Crime News
Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने मेडिकल चालकाला भोसकलेfile photo
Published on: 
Updated on: 

A young man was stabbed after being asked, "Why did you come to live in our area?"

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बहिणीच्या नव्या घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी आलेल्या कुंदन रवी सातदिवे (३०) या तरुणाला आमच्या भागात राहायला का आले? असा जाब विचारत दोघांनी त्याच्या पाठीवर आणि बरगडीत चाकू खुपसून पुन्हा दोन वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (दि. १०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हर्सल परिसरातील रमाईनगर (एकतानगर) येथे घडला. हर्सल पोलिसांनी दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Sambhajinagar News : लाखो रुपये खर्चुनही बसस्थानकात खड्डे कायम

हितेंद्र वाघमारे आणि महेंद्र नवनाथ वाघमारे (४०) अशी आरोपींची नावे आहेत. यातील महेंद्रला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. याप्रकरणी महापालिकेत सफाई कामगार असलेले कुंदनचे मोठे भाऊ कुणाल रवी सातदिवे (४०, रा. विनायक पार्क, देवळाई, बीड बायपास) फिर्यादीनुसार, त्यांची बहीण दीपाली शेखर इंगळे या बीबी का मकबरा परिसरातील गणेशनगर येथून रमाईनगर (हसूल) येथे नवीन घरात राहण्यासाठी आल्या आहेत.

शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आयशर ट्रकमधून घरगुती सामान उतरवून घरात ठेवण्याचे काम सुरू होते. सामान घरात ठेवल्यानंतर सर्वजण जवळच राहणाऱ्या नातेवाईकांकडे जेवण करून पुन्हा घरासमोर आले. त्यावेळी तिथे आरोपी हितेंद्र वाघमारे आणि महेंद्र वाघमारे यांनी त्यांना अडवले. तुम्ही आमच्या भागात राहण्यासाठी का आले? असा जाब विचारत दोघांनी सातदिवे कुटुंबीयांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावले.

Crime News
Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने मेडिकल चालकाला भोसकले

बरगडीत खुपसला चाकू

हा वाद सुरू असतानाच हितेंद्र वाघमारे याने चाकूने कुंदनच्या पाठीवर आणि डाव्या बरगडीत चाकू खुपसून पुन्हा दोनवेळा जीवघेणे वार केले. कुंदन रक्ताच्या थारोळ्यात पडला. कुणाल व त्यांच्या बहिणीने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि पसार झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय थोटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news