UP News: १९९५ च्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याची राज्यपालांकडून शिक्षा माफ; भाजप आमदाराने स्वतः नेले घरी

१९९५ मधील गाजलेल्या गोकरन सिंह यांच्यासह तिहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याची उर्वरित शिक्षा राज्यपालांनी माफ केली आहे.
Brijlal Mishra released
Brijlal Mishra releasedFile Photo
Published on: 
Updated on: 

UP Governor pardons life convict

बहराइच : उत्तर प्रदेशमध्ये १९९५ मधील गाजलेल्या गोकरन सिंह यांच्यासह तिहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याची उर्वरित शिक्षा राज्यपालांनी माफ केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर बृजलाल मिश्र या कैद्याची गुरुवारी सायंकाळी बहराइच जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, सुटकेनंतर स्थानिक भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी स्वतः कारागृहाबाहेर येत बृजलाल यांना आपल्यासोबत त्यांच्या घरी नेले.

हरदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९९५ मध्ये गोकरन सिंह यांच्यासह तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गोकरन सिंह यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून काही जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर, ७ सप्टेंबर २०१९ रोजी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीतून कारागृहात पाठवण्यात आले.

Brijlal Mishra released
CJP Lookout Circular: सीजेपीच्या दिपके, दास आणि रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून लुकआउट नोटीस

ते तेव्हापासून कारागृहातच होते. कारागृह अधीक्षक राजीव कुमार सिंग यांनी सांगितले की, हरदीतील सिकंदरपूर येथील रहिवासी बृजलाल मिश्र यांची शिक्षा माफ केल्याचे पत्र दोन दिवसांपूर्वीच राज्यपाल कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते.

कारागृहातील चांगली वर्तणूक आणि प्रकृतीचा विचार करून राज्यपालांनी हा निर्णय घेतला. गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता सुटकेचे आदेश मिळताच बृजलाल यांची मुक्तता करण्यात आली. ते गेल्या आठ वर्षांपासून कारागृहात होते. त्यांच्या सुटकेमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इतर आरोपींची सद्यस्थिती काय?

या तिहेरी हत्याकांडात बृजलाल मिश्र यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य महाराजदीन मिश्र, कौशल किशोर शुक्ल, बृजेश्वर सिंह आणि रमेश कुमार ऊर्फ राजू भुजवा यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. यातील महाराजदीन मिश्र आणि कौशल किशोर यांचे कारागृहातच निधन झाले असून, बृजेश्वर सिंह व राजू भुजवा हे अद्याप शिक्षा भोगत आहेत. सुटका झालेले बृजलाल मिश्र हे भाजपचे आमदार सुरेश्वर सिंग यांचे निकटवर्तीय आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर, आमदार सिंग यांनी स्वतः त्याला सोबत घेतले आणि त्याच्या घरी पोहोचवले.

Brijlal Mishra released
UP Election: 'अखिलेश मुख्यमंत्री व्हावेत, पण १०० जागांपेक्षा कमीवर तडजोड नाही’; युपीमध्ये सपा-काँग्रेसचा तिढा कसा सुटणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.