Madhavi Raje Scindia : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे यांचे निधन

Madhavi Raje Scindia : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई आणि ग्वाल्हेर राजघराण्याच्या पूर्वीच्या 'राजमाता' माधवी राजे शिंदे यांचे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.  रुग्णालयात आज (दि.१५) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्दे

  • १५ फेब्रुवारी रोजी माधवी राजे शिंदे यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
  • माधवी राजे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात येणार आहे.
  • ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची पत्नी प्रियदर्शनी राजे यांना निवडणूक प्रचार अर्धवट सोडून दिल्लीला जावे लागले होते. ते गुना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत.
  • राजमाता माधवी राजे या मूळच्या नेपाळच्या होत्या. नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या.
  • माधवी राजे यांचे आजोबा जुद्द समशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते.

उद्या ग्वाल्हेरमध्ये होणार अंत्यसंस्कार

लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी माधवी राजे शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया तसेच सेप्सिसचा त्रास होता. माधवी राजे यांच्यावर ग्वाल्हेर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी, आज दुपारी ३ ते ७ या वेळेत त्यांचे पार्थिव दिल्लीतील २७ सफदरजंग रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी ग्वाल्हेर येथे आणण्यात येणार आहेत.

माधवी राजे यांच्याबद्दल जाणून घ्या

माधवी शिंदे या राजघराण्यातील आहेत. त्यांच्या माहेरच्या घरालाही गौरवशाली इतिहास आहे. माधवी राजे शिंदे यांचे आजोबा जुड शमशेर जंग बहादूर हे नेपाळचे पंतप्रधान होते. एकेकाळी ते राणा घराण्याचे प्रमुखही होते. माधवी राजे यांना राजकुमारी किरण राज्य लक्ष्मी देवी म्हणूनही ओळखले जाते. १९६६ मध्ये नेपाळच्या राजघराण्यातील राजकुमारी माधवी यांचा विवाह ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याशी झाला होता. ३० सप्टेंबर २००१ रोजी तत्कालीन काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचा मैनपुरी (यूपी) जवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news