

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर टीका करणार्या अमेरिकन अधिकार्यांना एका प्रभावी अमेरिकन ज्यू वकिली गटाने चांगलेच फटकारले आहे. अमेरिकन ज्यू कमिटीने स्पष्ट केले आहे की, रशिया-युक्रेन युद्धासाठी भारत जबाबदार नाही आणि भारत-अमेरिका संबंध ‘रीसेट’ करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासनातील काही माजी अधिकारी भारताच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर टीका करत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ‘युद्धयंत्रा’ला आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हाईट हाऊसचे माजी व्यापार सल्लागार पीटर नॅव्हारो यांनी तर याला ‘मोदींचे युद्ध’ संबोधून शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो, असे वादग्रस्त विधान केले होते.
या टीकेला उत्तर देताना अमेरिकन ज्यू कमिटीने म्हटले आहे की, अमेरिकन अधिकार्यांकडून भारतावर होत असलेल्या टीकेमुळे आम्ही चकित आणि चिंतित आहोत. नॅव्हारो यांच्या विधानाला निराधार आरोप ठरवत समितीने पुढे म्हटले की, ऊर्जेची गरज असलेल्या भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व खेदजनक आहे; पण पुतीन यांच्या युद्धगुन्ह्यांसाठी भारत जबाबदार नाही. भारत एक सहकारी लोकशाही देश आणि अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांची राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा रद्द करण्याची मागणी केली आहे, ज्याचा वापर करून त्यांनी हे प्रचंड कर लादले होते. यामुळे भारतावर टीका करणार्यांच्या भूमिकेवर अमेरिकेतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका प्रभावी अमेरिकन ज्यू गटाकडून भारताच्या भूमिकेचे समर्थन; रशिया-युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मतट्रम्प प्रशासनातील माजी अधिकार्यांनी भारताच्या तेल खरेदीला ’मोदींचे युद्ध’ संबोधल्याने वाद निर्माण झाला आहे. भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा सामरिक भागीदार असून, दोन्ही देशांमधील संबंध नव्याने प्रस्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे.