Ujjain Road Widening Dispute : उज्जैनमध्ये शाही मशिदीजवळ रस्ता रुंदीकरणावरून तणाव वाढला; जमावाकडून दगडफेक

पोलिसांचा अश्रूधुराचा वापर; २५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात
Ujjain Road Widening Dispute :  उज्जैनमध्ये शाही मशिदीजवळ रस्ता रुंदीकरणावरून तणाव वाढला; जमावाकडून दगडफेक
Published on: 
Updated on: 

Ujjain Road Widening Dispute : रस्ता रुंदीकरणाच्या कामावरुन मध्‍य प्रदेशमधील उज्जैन शहरात शाही मशिदीबाहेर मोठा जमाव जमल्याने शहरात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. याचवेळी काहींनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जमावाकडून दगडफेक, परिसरात तणाव

काही काळ शांतता राहिल्यानंतर, पहाटेच्या सुमारास मुस्लिम समाजातील लोक आपापल्या घरी परतले होते. मात्र, काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी पुन्हा जमाव जमू लागला आणि घोषणाबाजी सुरू झाली. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, ये-जा रोखण्यासाठी ५०० मीटरचा परिसर बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे.त्यानंतर, घोषणाबाजी करत असतानाच जमावाने पोलीस प्रशासनाच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. शाही मशिदीजवळील परिस्थिती पाहता २५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

Ujjain Road Widening Dispute :  उज्जैनमध्ये शाही मशिदीजवळ रस्ता रुंदीकरणावरून तणाव वाढला; जमावाकडून दगडफेक
Parvesh Verma Controversy : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! कॅबिनेट मंत्र्याने तरुणाला लगावली कानशिलात

संपूर्ण शहरात पोलीस प्रशासनाचा अलर्ट

परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण शहरात सतर्कतेचा इशारा (अलर्ट) देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला जात आहे. पोलीस अधीक्षक (SP) आणि इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

Ujjain Road Widening Dispute :  उज्जैनमध्ये शाही मशिदीजवळ रस्ता रुंदीकरणावरून तणाव वाढला; जमावाकडून दगडफेक
Sonam Wangchuk : "संकटात साथ दिली, अन् आता..." ; निवडणूक आयुक्तांविरोधात CJPच्‍या आंदोलनाबाबत सोनम वांगचुक काय म्‍हणाले?

नेमका वाद काय?

रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पांतर्गत उज्जैनमधील शाही मशिदीचा काही भाग पाडला जाणार आहे. याला मुस्लिम समाजाचा विरोध आहे. या मुद्द्यावरून समाज आणि पोलीस यांच्यात बैठकही झाली होती. रात्रीच्या वेळी हा प्रश्न सुटल्याचे वाटत असले तरी, सकाळी पुन्हा वाद उफाळून आला. याला विरोध करत जमावाचा पोलिसांशी संघर्ष झाला. यानंतर दगडफेक झाली. वाद वाढल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून गर्दी पांगवली. सध्या तिथे वातावरणात मोठा तणाव असून सुरक्षेसाठी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'चे (RAF) जवान आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.परिस्‍थिती नियंत्रणात असली तरी परिसरातील तणाव कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news