

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात दिवसा रस्ताच्या कडेला फुटपाथवर कचरा, भंगार वेचणाऱ्या महिलेवर बलात्काराची घटना घडली. बुधवार ४ सप्टेंबर रोजी संतापजनक घटना घडली. आरोपीला अटक करण्यात आली असून, या बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ करणाऱ्या रिक्षाचालक मोहम्मद सलीम (वय - ४२) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने मध्य प्रदेश हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडितीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आराेपी लाेकेश याला पाोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेची माहिती देताना उज्जैनचे पोलिस अधिक्षक प्रदीप शर्मा यांनी म्हटलं आहे की, उज्जैनमधील फूटपाथवरच एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. ही घटना घडत असताना येथून ये जा करणाऱ्या लोकांनीही तिला वाचवलं नाही. दरम्यान, या संतापजनक घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाेलिसांनी तपास सुरु केला. जिल्हा पोलिस, सायबर आणि सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून संबंधित व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. संबंधित पीडितेला वाचवण्या ऐवजी मोहम्मद सलीम (वय - ४२) या रिक्षाचालकाने या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
आराेपी मोहम्मद सलीम याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७२ नुसार (विशिष्ट गुन्ह्यांना बळी पडलेल्या व्यक्तीची ओळख उघड करणे), ७७ (खासगी कृत्यात गुंतलेल्या महिलेचे चित्रीकरण करणे), २९४ (अश्लील सामग्रीची विक्री), आयटी कायद्यातील कलम ६७ आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याचे कलमान्वये आरोपी सलीमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.