Ujjain Mahakal Temple Stampede: उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती, अनेक भाविक जखमी

Ujjain Mahakal Temple Stampede
Ujjain Mahakal Temple Stampedepudhari
Published on
Updated on

Ujjain Mahakal Temple Stampede: श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी आज मध्य प्रदेश तसेच इतर राज्यातून भाविक महाकाल मंदिरात दर्शनासाठी येतात. वर्षातून फक्त एकदा उघडण्यात येणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी देखील या परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी मंदिर परिसरात हरसिद्धि मंदिराच्या समोर बॅरेकेट लावलेल्या भागात गर्दीचा दबाव अचानक वाढला. त्यामुळं चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. मंदिर प्रशासनाने इथं मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Ujjain Mahakal Temple Stampede
Ashok Dham Temple Stampede: दोन ट्रेन थांबल्या, विजेचा खांब पडल्याची अफवा; अशोकधाम मंदिराबाहेर चेंगराचेंगरीत ७ महिलांचा मृत्यू

गर्दीचा दबाव वाढल्यानंतर काही भाविकांची प्रकृती बिघडली. काही लोक बेशुद्ध पडले अशी देखील माहिती समोर येत आहे. घटनास्थळी सुरक्षा रक्षकांनी भाविक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गर्दीतून बाहेर काढले असून जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक रिपोर्टनुसार या घटनेत जवळपास १३ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

उत्तर भारतालील पंचांगानुसार श्रावणाचा तिसरा सोमवार असल्यानं तसेच नागचंद्रेश्वर मंदिराचे विशेष दर्शन घेण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येनं भाविक पोहचले होते. जवळपास ५.५० लाख भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतल्याचं सांगितलं जात आहे. नागचंद्रेश्वर मंदिराचे द्वार वर्षातून फक्त एकदाच उघडण्यात येतं. त्यामुळं उज्जैनमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Ujjain Mahakal Temple Stampede
Elphinstone Stampede: २०१७च्या दुर्घटनेत २३ जणांचा बळी; आजही जीवघेण्या गर्दीत प्रवाशांना पूल चढणे-उतरण्याची वेळ

आज तिसऱ्या श्रावण सोमवारी उत्तरेतील अनेक राज्यांमधील भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. बिहारमधील अशोक धाम मंदिरात देखील अशीच मोठी गर्दी झाली होती. तिथं देखील आज सकाळी चेंगरा चेंगरी झाली अन् ७ भाविकांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये सर्व महिला होत्या.

भाविकांच्या रांगेजवळ विजेचा खांब पडला अन् विजेच्या तारा भाविकांच्या अंगावर कोसळल्याची अफवा पसरली. त्यानंतर महिलांच्या रांगेत एकच गोंधळ उडाला अन् चेंगरा चेंगरी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news