सर्वजण मिळून सरकारचा सामना करू; उद्धव ठाकरेंचे केजरीवालांच्या कुटुंबाला आश्वासन

Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal | दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा
Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. ANI Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.८) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबाची भेट घेतली. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंनी आई-वडील, पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली. केजरीवाल यांना बळजबरीने तुरुंगात डांबले गेले, सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्याचे समजते. (Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal)

Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही : राज ठाकरे

Summary

  • उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

  • बुधवारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली.

  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सपाटा

Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी

सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू

या बैठकीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार संजय सिंह म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायपालिकेने आदेशाची प्रत न ठेवता त्यांची सुटका थांबवली. त्यांना बळजबरीने तुरुंगात डांबले गेले सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.”

Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली.ANI Photo

दरम्यान, बुधवारी दुपारी संजय सिंह यांनी उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट शिष्टाचार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच भाजप सरकारविरोधात आम्ही एकजूट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.

Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal
गजापूर तोडफोडीवर पवार, उद्धव ठाकरे गप्प का : आ. आझमी

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची बुधवारी घेतली भेट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि इंडिया अलायन्सच्या इतर काही नेत्यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news