सातार्‍यातून उदयनराजेंना अखेर भाजपचे तिकीट

File Photo
File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर अखेर सातार्‍यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की राष्ट्रवादीकडे (अजित पवार) जाईल, हा तिढा या दीर्घकाळ प्रतीक्षेमागे होता. तिढा अखेर सुटला आहे. मंगळवारी भाजपने उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सातार्‍यातून उदयनराजेंसह सात उमेदवारांची नावे आहेत. उदयनराजेंची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

बाराव्या यादीतील उर्वरित उमेदवार पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी आहेत. याआधी जाहीर झालेल्या भाजपच्या दोन-तीन उमेदवार याद्यांतून उदयनराजे भोसले यांचे नाव नव्हते. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदयनराज यांची दिल्लीत भेट झाली होती. नंतरही बर्‍याच कालावधीने उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झाले.
2019 च्या लोकसभेच्या वेळी सातारा लोकसभा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस लढत होती. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत तर अजित पवार गट महायुतीसोबत असे दोन गट दोन आघाड्यांमध्ये सहभागी झाले. महाविकास आघाडीमधून सातार्‍याची जागा शरद पवार गटाने मिळवली. मात्र महायुतीअंतर्गत अजित पवार गटाला ही जागा मिळू शकली नाही. सातार्‍याची जागा भाजपला की राष्ट्रवादीला यावर दीर्घकाळ चर्चा चालल्याने ही जागा जाहीर करण्यास उशीर झाल्याचे बोलले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news