Chhattisgarh | छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात चकमक, दोन नक्षली ठार

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरुन शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. मद्देड परिसरातील बद्देपारा येथे ही चकमक सुरु आहे.

या चकमकीत दोन नक्षली मारले गेले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना मद्देड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. येथील घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आला आहे.

यंदा आतापर्यंत ११८ नक्षलवादी ठार

या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत यावर्षी आतापर्यंत ११८ नक्षलवादी ठार झाले आहेत. २३ मे रोजी नारायणपूर-बिजापूर जिल्हा सीमेवरील जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी मारले गेले होते. १० मे रोजी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news