Tirupati Donated 121 kg Gold : तिरुपती चरणी चेन्नईतील दामप्त्‍याकडून २०६ कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोने अर्पण!

वर्धमान आणि राधिका जैन यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत दिली देणगी, मंदिराच्या इतिहासातील मोठी देणगी
Tirupati Donated 121 kg Gold : तिरुपती चरणी चेन्नईतील दामप्त्‍याकडून २०६ कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोने अर्पण!
Tirupati Donated 121 kg Gold : तिरुपती चरणी चेन्नईतील दामप्त्‍याकडून २०६ कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोने अर्पण!
Published on: 
Updated on: 

206 crore gold donation tirumala तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वराचे कोट्यवधी भक्त आहेत. हे भक्त देवाच्या चरणी हजारो लाखोंमध्ये दान करत असतात. दान देण्याची ही शेकडो वर्षांपासून परंपरा आहे आता या भक्तामध्ये चेन्न्ईच्या जैन दाम्पत्याने देवाप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्वितीय नमुना सादर करत, भगवान व्यंकटेश्वराला १२१ किलो सोने अर्पण केले. गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दान अर्पण करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे २०६ कोटी रुपये आहे.

वर्धमान आणि राधिका जैन या दाम्पत्याने तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (TTD) पुजारी आणि प्रतिनिधींकडे हे मौल्यवान दागिने औपचारिकपणे सुपूर्द केले. अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, मंदिराच्या इतिहासातील ही सर्वात लक्षणीय देणगी ठरली आहे.

या १२१ किलो सोन्यामध्ये आहे या दागिन्यांचा समावेश

४६ प्रकारचे नक्षीकाम केलेले सोन्याचे दागिने

सोन्याच्या दागिन्यांचे वजन १०६ किलो आहे

देवी पद्मावतीसाठी १५ किलो सोने

सोन्याच्या पादुका आणि पैंजणांच्या तीन जोड्या

नागमोडी नक्षीचा कमरेचा पट्टा (कंबरपट्टा)

तुळशीचे हार आणि अष्टोत्तर कासुला माला (नाण्यांचा हार)

चतुर्भुज लक्ष्मीचा हार

एक सोन्याचा मुकुट आणि एक सोन्याचा शंख

एकूण २,४२७ कॅरेट वजनाचे नीलम, पुष्कराज, माणिक आणि पाचू जडवलेले 'श्रीवत्सम' पदक

पाच पदरी सोन्याचा हार

कानातील झुमके आणि शाळीग्राम हार

या सोहळ्यानंतर बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी देणगीदार दाम्पत्याचे आभार मानले. "भगवान व्यंकटेश्वराला २०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण करणे ही एक असामान्य गोष्ट आहे. देवावरील अपार भक्ती आणि श्रद्धेपोटी हे जैन दाम्पत्य या देणगीसाठी पुढे आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो," असे ते म्हणाले.

नायडू यांनी सांगितले की, दैवी प्रेरणेतून आपण ही देणगी देत असल्याचे या दाम्पत्याने त्यांना सांगितले. तिरुमला हे श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक समाधानाचे प्रतीक असल्याचे नमूद करत, श्री कृष्णदेवरायांच्या काळापासून ते आजच्या पिढीपर्यंत भक्तांची ही अखंड श्रद्धा कायम राहिल्याचे ते म्हणाले. पल्लव, चोळ, चेर, पांड्य तसेच म्हैसूर आणि मराठा राजांसह प्राचीन राज्यकर्त्यांच्या योगदानाचे स्मरण करताना नायडू म्हणाले की, अनेक पिढ्यांतील भक्त आणि राज्यकर्त्यांनी मौल्यवान दागिने व अर्पणांद्वारे या मंदिराला समृद्ध केले आहे.

आंध्र प्रदेशात ५,००० मंदिरे उभारणार

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अलिपिरी बॉम्बस्फोटातून बचावल्याचा स्वतःचा वैयक्तिक अनुभवही सांगितला. "भगवान व्यंकटेश्वराने मला पुनर्जन्म दिला. त्यांच्याच आशीर्वादामुळे माझे प्राण वाचले," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मंदिराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि देवस्थानमच्या सहकार्याने संपूर्ण आंध्र प्रदेशात ५,००० मंदिरे उभारण्याच्या योजनांची घोषणाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.