

'बऱ्याच भाकिते पाहता, मला वाटते की अवलोकितेश्वरांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी आतापर्यंत माझे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन. तुमच्या प्रार्थना आतापर्यंत फलदायी ठरल्या आहेत, अशा शब्दांमध्ये तिबेटी बौद्धधर्मीयांसाठी सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांनी आज (दि. ५ जुलै) त्यांचा उत्तराधिकारी काेण हाेणार?, या चर्चेला पूर्णविराम दिला.
तिबेटी आध्यात्मिक नेते १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आजपासून मॅकलिओडगंजमध्ये दोन दिवसांचा कार्यक्रम सुरू आहे. या समारंभासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि इतर लोक मुख्य तिबेटी मंदिर आणि दलाई लामा यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. मॅकलिओडगंजमधील दलाई लामा मंदिर भव्य पद्धतीने सजवण्यात आले आहे.
शनिवारी मॅकलिओडगंजमधील त्सुगलागखांग येथील मुख्य दलाई लामा मंदिरात त्यांच्या दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो म्हणाले की, त्यांना अवलोकितेश्वरांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बऱ्याच भाकिते पाहता, मला वाटते की अवलोकितेश्वरांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी आतापर्यंत माझे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन. तुमच्या प्रार्थना आतापर्यंत फलदायी ठरल्या आहेत. जरी आपण आपला देश गमावला आहे आणि आपण भारतात निर्वासित जीवन जगत आहोत, परंतु येथे मी लोकांना खूप फायदा करू शकलो आहे. धर्मशाळेत शक्य तितका लोकांना फायदा करून त्यांची सेवा करण्याचा माझा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१४ वे दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ६ जुलै रोजी अधिकृतपणे साजरा केला जातो. सुमारे ४८ देशांतील दलाई लामांचे हजारो अनुयायी आणि बौद्ध धर्मशाळेत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाबाबत सुरक्षा यंत्रणाही पूर्णपणे सक्रिय आहेत. किरेन रिजिजू यांनी दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली, तर त्यांचा ९० वा वाढदिवस रविवारी साजरा केला जाईल. किरेन रिजिजू म्हणाले की, ते दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. जगभरातील भक्त येथे आले आहेत आणि मला आनंद आहे की मी देखील त्यांच्यात सामील होऊ शकलो.