

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील गडचिरोली. छत्तीसगढ या भागांत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमा भागात पुन्हा आज (दि.४) आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.