Tirupati Srivari Laddu 311 Years | तीन शतकांचा गोड वारसा; तिरुपतीच्या श्रीवारी लाडूला ३११ वर्षे पूर्ण

आजही मंत्रोच्चारात तयार होतो प्रसाद कच्च्या मालाच्या शुद्धतेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर
Tirupati Srivari Laddu
Tirupati Srivari Laddupudhari photo
Published on
Updated on
Summary

१७१५ मध्ये सर्वप्रथम नैवेद अर्पण झाला होता; आजही मंत्रोच्चारात तयार होतो प्रसाद कच्च्या मालाच्या शुद्धतेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर

तिरुमला : वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशच्या तिरुमला येथील श्री बैंकटेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध 'श्रीवारी लाडू' प्रसादाने आज (सोमवारी) ३११ वर्षाचा ऐतिहासिक टप्पा गाठला. २ ऑगस्ट १७१५ रोजी प्रथमच मंदिरातील पारंपरिक 'पोटू' (स्वयंपाकगृह) मध्ये तयार करण्यात आलेना बुंदीचा लाडू भगवान वेंकटेश्वरांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आला होता. तीन शतकांहून अधिक काळ लोटला, तरी या प्रसादाची चव, परंपरा आणि धार्मिक पवित्रता आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. कोट्यवधी भाविकांच्या हातात तोच प्रसाद, तीच परंपरा आणि तोच अवीट गोडवा पोहोचत आहे.

Tirupati Srivari Laddu
Hardik Pandya : अनंत नंतर पंड्याने केले मुंडण, जाणून घ्या या मंदिरात केस दान करण्याची काय आहे परंपरा?

मे २०२६ मध्ये तब्बल १.२१ कोटी तिरुमला लाडूंची चिकी होऊन नवीन विक्रम प्रस्थापित झाला होता। तिरुपतीचा श्रीवारी लाडू हा केवळ प्रसाद नसून श्रद्धा, परंपरा आणि व्यवस्थापनाचा अद्वितीय संगम मानला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाही मंदिर प्रशासनाने प्रसादाची धार्मिक परंपरा, गुणवत्ता आणि मूळ चव कायम राखली आहे. म्हणूनच 311 वर्षानंतरही हा लाडू जगभरातील कोट्यवधी माचिकांसाठी भक्तीचे, विश्वासाचे आणि तिरुमलाच्या अखंड परंपरेचे प्रतीक ठरला आहे.

लाडू तयार करण्यासाठी एआयचा वापर

लाडू तयार करण्याची प्रक्रिया ही केवळ पाककला नाही. तो धार्मिक विधी मानला जातो. सुमारे २७० कुशल आचारी आणि जवळपास ४०० सहायक कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी असतात. बेसन, तूप, साखर आणि इतर साहित्य मिसळण्यापासून ते हाताने लाडूंना आकार देण्यापर्यंत प्रत्येक टप्पा अत्यंत शिस्तबदा पद्धतीने पार पडतो. या प्रक्रियेदरम्यान वैष्णव ब्राह्मण 'ॐ नमो वेंकटेशाय या मंत्राचा अखंड जप तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण करतात.

दिवसातील तब्बल २० तास, तीन पाळ्यांमध्ये लाडू तयार करण्याचे काम सुरू असते. विशेष म्हणजे, लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची शुद्धता तपासण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणांची मदत घेतली जात आहे.

१० लाख लाडू उत्सव काळात रोज तयार होतात पूर्वी हा लाडू पूर्णपणे लाकडाच्या चुलीवर तयार केला जात असे. काळ बदलला. त्यानुसार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची निर्मिती केली जाते. मंदिरातील तीन मजली, २५ हजार बौरस फूट क्षेत्रफळाच्या स्वयंपाकगृहात गॅस व स्टीमवर चालणान्या यंत्रसामग्रीद्वारे दररोज ४.०८ लाखांहून अधिक लाडू तयार होतात. ब्रह्मोत्सव आणि मोठ्या उत्सवांच्या काळात ही संख्या १० लाखांपर्यंत पोहोचते

Tirupati Srivari Laddu
CJI Surya Kant : कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी वैयक्तिक असू शकत नाही; सरन्यायाधीश सूर्यकांत असं का म्‍हणाले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news