सीबीएसईच्या अभ्यासक्रमात इयत्ता तिसरी आणि सहावी वगळता कोणताही बदल नाही

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय
Information about changes in CBSE syllabus
सीबीएसईच्या अभ्यासक्रमातील बदलाबाबत माहितीPudhari File photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सीबीएसईच्या अभ्यासक्रमात किंवा पुस्तकांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी फक्त वर्ग तिसरी आणि वर्ग सहावीमध्ये बदल करण्यात आला आहे. याशिवाय इतर कोणत्याही वर्गाच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर सर्व वर्गांसाठी जुन्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम असेल, असे स्पष्टीकरण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले.

सीबीएसईने या संदर्भात नोटीस जारी करून, सर्व संलग्न शाळांना इयत्ता तिसरी आणि सहावी व्यतिरिक्त सर्व वर्गांसाठी जुन्या पाठ्यपुस्तकांमधून शिकवणे सुरू ठेवण्यास सांगितले आहे. सर्व वर्गांचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावरून विद्यार्थी अभ्यासक्रम जाणून घेऊ शकतात आणि त्याबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकतील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांने म्हटले आहे.

Information about changes in CBSE syllabus
सीबीएसईकडून अभ्यासक्रम जाहीर; असा पाहा नवीन अभ्यासक्रम

इयत्ता तिसरी आणि सहावीचा नवीन अभ्यासक्रम लवकरच प्रकाशित

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) सीबीएसईला कळवले आहे की, इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार होत आहेत. इयत्ता ६ वी ची सर्व पाठ्यपुस्तके एनसीईआरटीद्वारे जुलै २०२४ मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. परिणामी, शाळांना नवीन अभ्यासक्रमाचे पालन करण्यास सांगितले आहे. एनसीईआरटीद्वारे इयत्ता सहावीसाठी ब्रिज कोर्स आणि इयत्ता तिसरीसाठी संक्षिप्त मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news