सीबीएसईकडून अभ्यासक्रम जाहीर; असा पाहा नवीन अभ्यासक्रम

सीबीएसईकडून अभ्यासक्रम जाहीर; असा पाहा नवीन अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून, बारावीच्या परीक्षा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएसईने आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाचे वर्गीकरण माध्यमिक अभ्यासक्रम आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम असे केले आहे. माध्यमिक अभ्यासक्रम नववी आणि दहावीसाठी आहे, तर अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, सीबीएसईने या वेळी तिसरी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच नवीन पुस्तकेही उपलब्ध केली जाणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असतील. यासोबतच दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तर, बारावीसाठी 7 विषय अनिवार्य करण्यात आले आहेत. या यादीमध्ये मानविकी, गणित, भाषा, विज्ञान, सामान्य अध्ययन, कौशल्य विषय आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यांचा समावेश आहे.

असा पाहा नवीन अभ्यासक्रम

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https:/// www. cbse. gov. in da OmD$Z Academic Website  वर जाऊन अलरवशाळल थशलीळींश च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सत्र 2024-25 अभ्यासक्रमाची लिंक मुख्यपृष्ठावरील शैक्षणिक विभागात दिसून येईल. त्यावर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन पीडीएफ दिसेल, ती काळजीपूर्वक वाचा आणि डाउनलोड करा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news