अमेरिकेने भारतीयांना दिली खूशखबर, यावर्षी 2.5 लाख नवीन व्हिसा जारी

US Visa साठी १० लाखांहून अधिक अर्ज
US Visa
US Visa Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेने (US) या वर्षी पुन्हा एकदा भारतासाठी विक्रमी संख्येने व्हिसा जारी केले आहेत. अमेरिकन दूतावासाने सोमवारी (दि.३०) अधिकृत एक्स (X) पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, पर्यटक, कुशल कामगार आणि विद्यार्थ्यांसह भारतीय प्रवाशांसाठी 250,000 अतिरिक्त व्हिसा जारी करण्यात आले आहेत.

United States of America, Department of State U.S. Embassy & Consulates in India

US-IND संबंधांना नवीन उभारी मिळणार

भारतातील यूएस दूतावासाने पर्यटक, कुशल कामगार आणि विद्यार्थ्यांसह भारतीय प्रवाशांसाठी अतिरिक्त 250,000 व्हिसा अपॉइंटमेंट बाजूला ठेवल्या आहेत. नुकतेच जारी करण्यात आलेले नवीन स्लॉट लाखो भारतीय अर्जदारांना त्यांचा व्हिसा वेळेवर मिळण्यास मदत करतील. त्यामुळे प्रवासाची सोय होईल. अमेरिका सरकारच्या या निर्णयामुळे युएस-भारत संबंधांना नवीन उभारी मिळेल, असे देखील भारतीय अमेरिन दूतवासाने म्हटल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.

इतर देशांपेक्षा भारतीय स्टूडंट्ससाठी सर्वाधिक व्हिसा

अमेरिका दूतावासने सोमवारी (दि.३० एका निवेदनात म्हटले आहे की, “ यावर्षी(२०२४) आम्ही आमच्या स्टूडंट्स व्हिसा सीजनच्या प्रक्रियेत आहोत. अमेरिकेने या वर्षी भारतात पुन्हा एकदा विक्रमी संख्येने विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत. गेल्या वर्षी जारी केलेल्या 1.4 लाखांहून अधिक स्टूडंट्स व्हिसा या वर्षी जारी करण्यात आले आहेत. तसेच जागतिक स्तरावर इतर देशांच्या तुलनेत भारतासाठी सर्वात जास्त स्टूडंट्स व्हिसा जारी केल्याचे देखील भारतीय अमेरिकन दूतवासाने स्‍पष्‍ट केले आहे.

US च्या व्हिसासाठी १० लाख अर्ज

"नवीन स्लॉट्स लाखो भारतीय अर्जदारांना वेळेवर मुलाखती घेण्यास मदत करतील, प्रवास सुलभ करतील. भारतातील यूएस मिशनने सलग दुस-या वर्षी 10 लाख बिगर स्थलांतरित व्हिसा अर्ज आधीच ओलांडले आहेत" असे देखील अमेरिकेने आपल्‍या निवेदनात स्पष्ट केले आहे.

PM नरेंद्र मोदी- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी वचन निभावले

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हिसा प्रक्रियेत सुधारणा आणि वेगवान करण्याचे एक महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले होते. त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले याचा त्यांना अभिमान आहे, असे देखील भारतातीय अमेरिकेच्या राजदूतांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news