NIA Arrested Khalistani Operative : NIAने खलिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या! नाभा तुरुंगातून पळून गेलेल्या गुन्हेगाराला बिहारमधून अटक

2016 मध्ये नाभा तुरुंगातून पळून गेलेला कुख्यात दहशतवादी कश्मीर सिंग गल्लवाडी याला बिहारमधील मोतिहारी येथून अटक केली आहे.
National Investigation Agency (NIA) arrested Khalistani operative
NIA ची टीम पहलगाम हल्ला स्पॉटला पोहचलीPahalgamTerroristAttack
Published on
Updated on

the national investigation agency (NIA) arrested Khalistani operative

नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्था एनआयए (NIA)ने रविवारी एक मोठी कामगिरी करत खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI)शी संबंधित प्रमुख दहशतवादी कश्मीर सिंग गल्लवाडी याला बिहारमधील मोतिहारी येथून अटक केली आहे. तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, तो 2016 मध्ये पंजाबमधील नाभा जेल ब्रेक दरम्यान फरार झाला होता आणि चिदेशस्थित दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ ‘रिंदा’ याच्याशी तो संबंधित आहे.

एनआयएने बिहारच्या मोतिहारी पोलिसांच्या सहकार्याने ही अटक खलिस्तानी दहशतवादी कटाशी संबंधित एका प्रकरणात केली आहे. नाभा जेलमधून पळून गेल्यानंतर आरोपी कश्मीर सिंग नेपालमध्ये BKI आणि रिंदा नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि तो सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता.

एनआयएच्या माहितीनुसार, कश्मीर सिंग याची भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय, लॉजिस्टिक मदत आणि निधी पुरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती

त्याची एनआयए केस क्रमांक आरसी ३७/२०२२/एनआयए/डीएलआय मध्ये अटक गरजेची होती. ज्यामध्ये पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावरील आरपीजी हल्ल्यासारख्या घटनांचा समावेश आहे. एनआयएने ऑगस्ट 2022 मध्ये स्वतःच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF), इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) सारख्या बंदी घातलेल्या संघटनांच्या दहशतवादी कारवायांची चौकशी केली जात आहे. या तपासात दहशतवादी संघटना आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील संबंध उघड झाले आहेत. ज्यात शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि आयईडी इत्यादींची तस्करी करून भारतात दहशत पसरवण्याचा कट रचत होते.

विशेष एनआयए न्यायालयाने काश्मीर सिंगला फरार घोषित केले होते आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एनआयएने त्याच्या अटकेसाठी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. जुलै 2023 मध्ये, एनआयएने रिंदा, लांदा याच्यासह 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यानंतर, दोन पुरवणी आरोपपत्रांमध्ये इतर सहा आरोपींची नावेही समाविष्ट करण्यात आली. ऑगस्ट 2024 मध्ये, लांदाचा भाऊ तरसेम सिंग याचे युएईमधून प्रत्यार्पण करण्यात आले आणि डिसेंबरमध्ये तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news